राशिभविष्य

Budh Guru Vakri: बुध-गुरु वक्री वाढवणार टेन्शन; 'या' राशींना होणार तोटा, तब्येतही बिघडू शकते

Budh Guru Vakri: नोव्हेंबर महिना सुरू झाला असून या महिन्यात अनेक मोठे सण आहेत. त्याचप्रमाणे या महिन्यात अनेक मोठे ग्रह त्यांच्या स्थितीत बदल करणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

नवीन महिन्यात कोणता ना कोणता ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. अशातच आता नोव्हेंबर महिना सुरू झाला असून या महिन्यात अनेक मोठे सण आहेत. हा महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण या महिन्यात अनेक मोठे ग्रह त्यांच्या स्थितीत बदल करणार आहेत.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध 26 नोव्हेंबरला वक्री होणार आहे. याशिवाय बृहस्पति आधीच वक्री चाल चालतोय. या ग्रहांच्या बदलांचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना याचा नकारात्मक परिणाम भोगावा लागणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना काही अडचणी आणू शकतो. या काळात तुम्ही कर्ज घेणं टाळा. प्रेमसंबंध किंवा वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. या काळात नाती हुशारीने हाताळावी लागतील. तुम्हाला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांना या काळात काळजी घ्यावी लागणार आहे. पैशांचे व्यवहार अजिबात करू नका. तुम्ही आजारी पडण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना धावपळ करावी लागू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होण्याचा धोका आहे.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी बुध आणि गुरूची वक्री चाल चांगली ठरणार नाही. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. व्यवसायाशी संबंधित लोकांच्या उत्पन्नात घट होणार आहे. गुंतवणुकीतूनही अपेक्षित नफा मिळणार नाही. कुटुंबामध्ये वाद होऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलकर्त्याला साथ का दिली? जाब विचारत अजित पवारांचा नेता घरात घुसला, दगड- कोयत्याने कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Highest Grossing Movies : 2025मध्ये 'छावा' चा बोलबाला, सर्वाधिक कमाई करणारे 5 चित्रपट कोणते?

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये भरधाव कार नदीत कोसळली, एकाचा मृत्यू

Smartphone Effects: स्मार्टफोनचा झोपेवर दुष्परिणाम! झोपण्यापूर्वी फोन वापरल्याने घटते झोपेचे हार्मोन?

Migraine Solution : मायग्रेनने त्रस्त आहात? या जपानी ट्रिकने मिळेल आराम

SCROLL FOR NEXT