Surya Rashi Parivartan Saam Tv
राशिभविष्य

Surya Rashi Parivartan: 13 मे पर्यंत या राशींवर राहणार सूर्यदेवाची कृपा, सगळ्या अडचणी होणार दूर

Horoscope Rashi Bhavishya: ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला विशेष स्थान आहे. सूर्य देवाला सर्व ग्रहांचा राजा म्हणतात. जेव्हा सूर्यदेव शुभ असतो तेव्हा माणसाला खूप मान-सन्मान मिळतो आणि धनाची प्राप्ती होते.

साम टिव्ही ब्युरो

Horoscope Rashi Bhavishya:

ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला विशेष स्थान आहे. सूर्य देवाला सर्व ग्रहांचा राजा म्हणतात. जेव्हा सूर्यदेव शुभ असतो तेव्हा माणसाला खूप मान-सन्मान मिळतो आणि धनाची प्राप्ती होते. सूर्य देवाच्या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांना याचा चांगला फायदा होतो. 13 मे पर्यंत सूर्य देव मीन राशीत राहील. मीन राशीत राहिल्याने सूर्यदेवाची काही राशींवर विशेष कृपा राहणार आहे, कोणत्या आहेत या राशी? हेच जाणून घेऊ...

मेष

आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. भाऊ-बहिणीकडून मदत मिळू शकते. धैर्य आणि शौर्य वाढेल. मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठेत वाढ होईल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कामात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायासाठी वेळ शुभ राहील. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदाचा अनुभव येईल.

मिथुन

नोकरी-व्यवसायासाठी काळ शुभ आहे. मानसन्मान मिळेल. तुमच्या कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. पदोन्नती किंवा आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही. व्यवहारासाठी वेळ शुभ आहे.

सिंह

या काळात कौटुंबिक नात्यात गोडवा वाढेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. पैशाशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. गुंतवणुकीतून लाभ होईल.

कन्या

व्यवहारासाठी वेळ शुभ आहे. या काळात तुमचा मान-सन्मान वाढेल. नोकरीच्या ठिकाणी लाभ होईल. सूर्य संक्रमण काळात तुम्हाला यश मिळेल. पैशाची आवक होण्याच्या नवीन संधी मिळतील. व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो. हा काळ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC चे सहाय्यक आयुक्त महेश पाटील निलंबित; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीला फसवल्याचा आरोप

Maharashtra News Live Update : ऑनलाइन खत वाटपाचा निर्णय ४८ तासात मागे घ्या,कृषी अधिकाऱ्यांना इशारा

Monsoon Update : संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून कधी सक्रीय होणार, हवामान विभागाने मुंबई-पुण्याच्या पावसावरही दिली अपडेट

Satara Monsoon Tourism: महाराष्ट्राची फुलांची दरी, रहस्यमय विहीर अन् नयनरम्य धबधबा; या पावसाळ्यात पुणे नव्हे, साताऱ्यातल्या या 7 ठिकाणांना द्या भेट

Marathi Serial: 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत मोठा ट्वीस्ट; जीवा-नंदिनीच्या आयुष्यात येणार नवा पाहुणा नक्की कोण?

SCROLL FOR NEXT