Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Mahalaxmi Rajyog: मंगळ चंद्रासोबत युती करून बनवणार खास योग; 'या' राशींवर पडणार पैशांच पाऊस

Mahalaxmi Rajyog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे गोचर आणि त्यांची युती अनेक शुभ-अशुभ योग तयार करत असते. मंगळ आणि चंद्र या दोन शक्तिशाली ग्रहांनी एकत्र येऊन एक अत्यंत शुभ योग तयार केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ नवग्रहांमध्ये अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. 27 ऑक्टोबर रोजी मंगळाने राशी परिवर्तन करून आपल्या स्वराशी वृश्चिक राशीत प्रवेश केला. मंगळ या राशीत 7 डिसेंबरपर्यंत राहणार आहे. या काळात मंगळ इतर ग्रहांशी युती किंवा दृष्टि करून शुभ-अशुभ राजयोगांची निर्मिती करणार आहे. 20 नोव्हेंबरला चंद्रही या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मंगळ–चंद्र युतीने महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे.

वैदिक ज्योतिषानुसार, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 4:13 वाजता चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. अशावेळी मंगळासोबत युती करून महालक्ष्मी राजयोग तयार होणार असून यावेळी काही राशींना लाभ होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मकर रास (Makar Zodiac)

मकर राशीच्या कुंडलीत मंगळ–चंद्र युती अकराव्या भावात होत आहे. दहाव्या भावात शुक्र मालव्य राजयोग तयार करणार आहे. तर सातव्या भावात गुरु हंस महापुरुष राजयोग निर्माण करणार आहे. यामुळे उत्पन्नात उल्लेखनीय वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी परदेशातूनही लाभ मिळू शकतो.

कन्या रास (Kanya Zodiac)

कन्या राशीच्या कुंडलीतील तिसऱ्या भावात महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. मंगळ–चंद्र युती या राशीच्या जातकांसाठी विशेष ठरू शकणार आहे. आकस्मिक धनलाभाचे योग आहेत. या काळात तुम्हाला व्यापार क्षेत्रात लाभ मिळणार आहे. तुमचं मन प्रसन्न राहील

वृश्चिक राशि (Vrashchik Zodiac)

वृश्चिक राशीच्या जातकांसाठी मंगळ–चंद्र युतीने तयार झालेला महालक्ष्मी राजयोग अत्यंत शुभ ठरणार आहे. लग्नभावात मंगळ–चंद्र युती आणि भाग्यभावात गुरुची उपस्थिती भाग्याला बळकटी देणार आहे. दीर्घकाळापासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. पद आणि प्रतिष्ठा मिळण्याचे प्रबळ योग आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आमदार सुनील शेळकेंच्या कुटुंबीयांवर जमिनीत उत्खननाचा आरोप, काकडेंकडून कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिकेसाठी मनसेची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक

कोणत्या भाज्यांमध्ये टॉमेटोची प्युरी घालू नये, बेचव होईल भाजी

Sleeveless top fashion tips: तुमच्यासाठी कोणता टॉप परफेक्ट? स्लिव्हलेस की फुल स्लीव्ह्ज...ही एक सोपी ट्रिक करेल तुमची मदत

Mumbai : ठाकरे बंधूंचा महापालिकेत करेक्ट कार्यक्रम होणार, भाजपने सोडला टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT