Shani Rashifal March 2024 Saam Tv
राशिभविष्य

Shani Rashifal March: मार्च महिन्यात या 4 राशींवर शनिदेवाची होईल कृपा, प्रत्येक संकटातून मिळेल मुक्ती

Shani Rashifal March 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचा अस्त आणि उदय खूप खास मानला जातो. असे मानले जाते की, याचा 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो.

साम टिव्ही ब्युरो

Shani Rashifal March 2024:

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचा अस्त आणि उदय खूप खास मानला जातो. असे मानले जाते की, याचा 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. 2024 मध्ये शनिदेव वर्षभर कुंभ राशीत राहील. 11 फेब्रुवारी 2024 रोजी शनि कुंभ राशीत अस्त झाला आणि आता सुमारे 36 दिवसांनी 18 मार्च रोजी कुंभ राशीत पुन्हा प्रवेश करणार आहे.

त्यामुळे शुभ प्रभावामुळे मार्च महिन्यात काही राशींवर शनिदेवाची विशेष कृपा असेल. या राशीच्या लोकांना शनीच्या प्रकोपापासून दिलासा मिळेल आणि त्यांच्या जीवनात आनंदच येईल. चला जाणून घेऊया मार्च महिन्यात शनिदेव कोणत्या राशींवर कृपा करतील... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मेष : उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल. व्यवसायाची स्थिती चांगली होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. व्यवसायात लाभ होईल. मार्च महिन्यात शनिदेवाच्या कृपेने मेष राशीच्या लोकांचे सर्व त्रास दूर होतील.  (Latest Marathi News)

सिंह : कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळेल. नोकरीत बढतीची शक्यता वाढेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.

धनु : तुमच्या कामाचे अपेक्षित परिणाम मिळतील. नोकरी-व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मानसिक तणावातून आराम मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांना शनिदेवाची विशेष कृपा असेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढती किंवा मूल्यांकन होऊ शकते. व्यवसायात विस्ताराच्या नवीन संधी मिळतील. आर्थिक बाजू मजबूत राहील. व्यावसायिक जीवनात महत्त्वाचे बदल होतील.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : ऑक्टोबरच्या कडक उन्हात वाढतो हाय BP चा धोका, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra News Live Update: मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी

Bike engine oil: किती किलोमीटर्सनंतर बदलायचं बाईकचं इंजिन ऑईल?

Tube tyres vs tubeless tyres: ट्यूबलेस टायर आणि ट्यूब टायर यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे?

IPS Transfer : प्रशासनात मोठा बदल! ५ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT