Venus Transit In Tula saam tv
राशिभविष्य

Malavya rajyog: १० दिवसांनी तयार होणार मालव्य राजयोग; 'या' राशींना होणार धनलाभ

Venus Transit In Tula: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतो. असाच शुक्राच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा खास राजयोग तयार होतात. येत्या काळात शुक्र ग्रह मालव्य राजयोग तयार करणार आहे.

धन आणि संपत्तीचा कारक असलेला शुक्र 18 सप्टेंबर रोजी स्वतःच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्र सुमारे 1 वर्षानंतर तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या गोचरमुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींना याचा अधिक फायदा होणार आहे.

तूळ रास

मालव्य राजयोगाची निर्मिती तुमच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी काही लोकांची करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक आणि मालमत्तेतून लाभ मिळू शकतो. विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन छान असणार आहे. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

मकर रास

मालव्य राजयोग तयार झाल्याने मकर राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात यश मिळू शकणार आहे. पैशांची बचत करण्यात तुम्हाला यश मिळू शकणार आहे. बिझनेस करणाऱ्या व्यक्तींना यावेळी चांगला फायदा होऊ शकतो.

कुंभ रास

मालव्य राजयोगाची निर्मिती या राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. उत्पन्न वाढीचे नवीन स्रोत मिळतील. करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येणार आहे. अभ्यासासाठी परदेशात जायचे होते त्यांनाही ही संधी मिळेल.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा समाजाला 10 टक्के दिले, यात आणखी काय देता येईल याचा प्रयत्न सुरू - बावनकुळे

Slowest Train In India: भारतातील सर्वात धीमी गतीने धावणारी ट्रेन कोणती? सरासरी वेग ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

Manoj Jarange Biography : शिक्षण सोडलं, हॉटेलवर काम केलं, काँग्रेस कार्यकर्ता झाला मराठ्यांचा सरदार, मनोज जरांगेंचा धगधगता प्रवास

Azad Maidan Place: आझाद मैदान कुठे आहे

Tamilnadu :धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत असलेल्या भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT