March Grah Gochar saam tv
राशिभविष्य

March Grah Gochar: मार्चमध्ये सूर्य, शनीसोबत अनेक ग्रहांच्या चालीत होणार बदल; 'या' 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभही होणार

March 2025 Planet Transits : महिन्याच्या सुरुवातीला धनदाता शुक्र मीन राशीत वक्री होणार आहे. यानंतर याच महिन्यात 15 मार्च रोजी ग्रहांचा राजकुमार बुध मीन राशीत अस्त होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

दर महिन्याला ग्रहांचं गोचर होत असतं. या मार्चमध्ये देखील काही ग्रह गोचर करणार आहेत. ग्रह गोचरच्या दृष्टीने मार्च महिना खूप खास असणार आहे. याचं कारण म्हणजे मार्च महिन्यात सूर्य, शनीसह अनेक ग्रहांच्या हालचालींमध्ये बदल होणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला धनदाता शुक्र मीन राशीत वक्री होणार आहे. यानंतर याच महिन्यात 15 मार्च रोजी ग्रहांचा राजकुमार बुध मीन राशीत अस्त होणार आहे.

मार्च मध्ये 30 वर्षांनंतर मीन राशीत रवि-शनी युती होणार आहे. सूर्य 14 मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर 29 मार्च रोजी शनी देखील मीन राशीत प्रवेश करणार असून या ग्रहांचा प्रभाव सर्व राशींवर दिसणार आहे. मात्र यावेळी 3 राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींना सकारात्मक परिणाम मिळणार आहे ते पाहूयात.

मिथुन रास

मार्च महिना तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. शनी देव आणि सूर्यदेव आपल्या राशीतून कर्मभावात संचार करून युती करणार आहेत. तुम्हाला प्रत्येक बिझनेसमध्ये चांगला नफा मिळू शकतो. या महिन्यात तुम्हाला तुमच्या तांत्रिक ज्ञानाचा फायदा होणार आहे. व्यापारी वर्गाच्या लोकांसाठी परिस्थिती शुभ राहील. वडिलोपार्जित मालमत्तेचा आनंद मिळू शकतो.

कर्क रास

मार्च महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. कारण शनिदेवाचे भ्रमण होताच शनीच्या संयमातून मुक्ती मिळेल. त्याचबरोबर तुमच्या राशीतून नवव्या भावात सूर्य आणि शनीची युती तयार होईल. नोकरदार वर्गातील लोकांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळतील.

कुंभ रास

मार्च महिना तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. या वेळी तुम्हाला वेळोवेळी आकस्मिक लाभ मिळू शकतात. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक योजना यशस्वी होतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुमच्या कमाईतही वाढ होईल. तुमच्या बोलण्यातील प्रभाव वाढू शकतो. नवीन लोकांशी आपले संबंध बनतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

SCROLL FOR NEXT