Love Horoscope  Saam Tv
राशिभविष्य

Horoscope: प्रेमी जीवनात येणार विरहाचे क्षण! या तीन राशींच्या प्रेमात विरजन घातली राहू-केतू

Love Horoscope: नव्या वर्षात १२ राशींपैकी तीन राशींच्या प्रेम जीवनात विरह येणार आहे. या राशीच्या जातकांच्या प्रेम जीवनात भूकंप येण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

नव्या वर्षात तीन राशीच्या प्रेम जीवनात दु: खाचे क्षण येणार आहेत. या राशींच्या जातकांचे ब्रेकअप होण्याची शक्यता आहे. तर काही लोकांच्या लग्नात अडचण येण्याची शक्यता आहे. वर्ष २०२५ मध्ये वैदिक पंचांगानुसार, या वर्षाशी मंगळ ग्रहाचं राज्य असेन. ज्या लोकांवर मंगळ ग्रह खूस असेन त्या जातकांना सुखाचे दिवस येतील. तर ज्या लोकांवर मंगळ नाराज राहतील त्याच्या प्रेम जीवनात दु: ख येण्याची शक्यता आहे. त्यांच्या जीवनात दु:ख दिवस येणार आहेत. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.

मंगळ ग्रहासह गुरू, शनी, राहू, आणि केतू ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्याचा परिणाम १२ राशींपैकी ३ राशींवर होणार आहे. त्यांच्या प्रेम जीवनात दु:खाचे दिवस येणार आहेत. या तीन राशी कोणत्या हे आपण आता जाणून घेऊ.

कर्क राशी

वर्ष २०२५ च्या कर्क राशीच्या जातकांच्या प्रेमात विरजन पडणार आहे. त्यांना विरहाचा सामना करावा लागणार आहे. ग्रहाच्या संक्रमणाचा वाईट परिणाम या राशीच्या जीवनावर पडणार आहे. कर्क राशीतील काही लोकांच्या नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.

यामुळे या राशींच्या लोकांनी आपल्या स्वभावात शांतीचा मार्ग स्वीकारावा.

काय कराल उपाय -

जर तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात आनंद कायम राहू द्यायचा असेल तर २०२५ मध्ये भगवान शिवाची नियमित पूजा करा. चांदीच्या वस्तू वापरा.

सिंह राशी

मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे वर्ष २०२५ मध्ये मे महिन्यापासून सिंह राशीच्या जातकांनाही जीवनातही दु:खाचे दिवस येणार आहेत.

जे जातक रिलेशनशिपमध्ये आहेत, ते चुकीचे निर्णय घेऊ शकतात. त्याच्यासह त्यांच्या कुटु्ंबियांसुद्धा समस्या जाणवतील. जर तुम्हाला या समस्येपासून मुक्तता हवी असेल तर तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत लगेचच तुमच्या लग्नाचं सांगून टाका. जे लोक विवाहित आहेत, तर त्यांच्या जीवनातही अडचणी येण्याची शक्यता आहे. जोडप्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही तुमच्या प्रेम जीवनाविषयी गंभीर नसाल तर तुम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागेल.

काय कराल उपाय- जर तुम्हाला असं होऊ द्यायचे नसेल तर महिलांनी अंघोळीनंतर स्वंयपाक घरात जावं आणि पुरुषांनी दररोज सूर्य देवाला पाणी अर्पण करावे.

तुळ राशी

जे लोक विवाहित आहेत किंवा लग्न करणार आहेत, त्यांनी २०२५ मध्ये त्यांच्या नात्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये पैसा येऊ देऊ नका. अन्यथा नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. तूळ राशीच्या लोकांनी आपल्या लोभावर नियंत्रण ठेवावे. अन्यथा यामुळे तुमचे नाते कायमचे तुटू शकते.

काय कराल उपाय-

जर तुम्हाला तुमच्या लव्ह लाईफमध्ये प्रेम टिकून राहायचे असेल तर शुक्रवारी तुमच्या जोडीदाराला परफ्यूम भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

SCROLL FOR NEXT