Laxmi Narayan Raj Yog saam tv
राशिभविष्य

Laxmi Narayan Rajyog: चंद्राच्या राशीमध्ये बनणार लक्ष्मी नारायण योग; धनलाभास करियरमध्ये मिळणार उत्तम संधी

Laxmi Narayan Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे विशिष्ट संयोग (युती) जीवनात मोठे बदल घडवून आणतात. असाच एक अत्यंत शुभ आणि धनदायक योग म्हणजे 'लक्ष्मी नारायण योग'

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सौंदर्य, ऐश्वर्य, धन-संपत्ती, भौतिक सुख सुविधा, वैवाहिक सुख आणि विलासिता यांचा कारक मानलं जातं. तर बुध ग्रह व्यापार, बोलणं, बुद्धिमत्ता, अर्थकारण आणि शेअर बाजार यांचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे जेव्हा या दोन्ही ग्रहांची युती होते तेव्हा ती युती संबंधित क्षेत्रांवर मोठा प्रभाव पडतो.

या ऑगस्ट महिन्यात शुक्र आणि बुध कर्क राशीत एकत्र येऊन 'लक्ष्मी नारायण राजयोग' तयार करणार आहे. या शुभ संयोगामुळे काही राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. यावेळी काही राशींना धनयोग तर करियरमध्ये चांगली संधी मिळणार आहे. कोणत्या राशींना यावेळी लाभ मिळू शकणार आहे.

तूळ रास

तुळ राशीच्या लोकांसाठी हा योग अत्यंत फलदायी ठरू शकणार आहे. हा राजयोग त्यांच्या कुंडलीतील दशम भावात तयार होणार आहे. या काळात तुळ राशीच्या जातकांना नोकरीत किंवा व्यवसायात प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत असाल तर वरिष्ठांचा विश्वास मिळणार आहे. मीडिया, मार्केटिंग, लेखन किंवा जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष यश मिळणार आहे.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा राजयोग अत्यंत शुभ ठरणार आहे. हा योग त्यांच्या कुंडलीतील नवम भावात तयार होतोय. या काळात तुमचं नशीब तुम्हाला साथ देणार आहे. एखादी छोटी अथवा लांबची यात्रा होण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणी कमी होणार आहे जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

कर्क रास

कर्क राशीसाठी तर हा योग अगदी खास ठरणार आहे. कारण हा योग त्यांच्या लग्न भावातच तयार होत आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनेल. नोकरी करत असाल तर प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. पार्टनरशिपच्या कामांमध्ये विशेष लाभ होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Esha Gupta Photos: रॉयल लूकमध्ये दिसली अभिनेत्री, फोटो पाहून सौंदर्याचं कराल कौतुक

Padmagad Fort History: सिद्दीला रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्यात बांधला हा जलदुर्ग; नेमका आहे तरी कुठे?

Tuesday Horoscope: मेषसह ४ राशींचा मानसिक ताण वाढेल! काहींवर पैशाचा पाऊस, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: जैन मुनी निलेशचंद्र यांचं उपोषण मागे, १५ दिवसानंतर घेतली माघार

Local Body Election : अजित पवार गट भाजप, शिंदे गटाला धक्का देण्याच्या तयारीत, धुळ्यात राजकारण तापणार

SCROLL FOR NEXT