Zodiac signs spiritual and professional success saam tv
राशिभविष्य

Zodiac signs success: कृष्ण तृतीया आणि मिथुन चंद्र; आजचा दिवस कोणासाठी उघडणार यशाचे दरवाजे?

gemini moon astrology zodiac signs benefits: हिंदू पंचांगानुसार, आजचा दिवस कृष्ण तृतीया असून, चंद्र मिथुन राशीत आहे. या विशेष ग्रहस्थितीमुळे काही राशींसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज 7 डिसेंबर रविवारचा दिवस आहे. आज हेमंत ऋतूचा प्रभाव जाणवणारा शांत आणि स्थिर ऊर्जा देणारा दिवस आहे. चंद्र आज मिथुन राशीत असल्याने विचारशक्ती, संवाद, योजना आणि निर्णयक्षमता यामध्ये स्पष्टता वाढण्याची शक्यता आहे. काही राशींना कार्यसिद्धी, आर्थिक लाभ आणि नातेसंबंधात सकारात्मकतेचा अनुभव मिळू शकणार आहे.

पंचांग – ७ डिसेंबर २०२५

  • तिथि – कृष्ण तृतीया

  • नक्षत्र – पुनर्वसु

  • करण – विष्टि

  • पक्ष – कृष्ण पक्ष

  • योग – शुक्ल (रात्री 08:07:39 पर्यंत)

  • दिन – रविवार

सूर्य आणि चंद्र गणना

  • सूर्योदय – 06:51:50 AM

  • सूर्यास्त – 05:25:30 PM

  • चंद्रोदय – 07:58:00 PM

  • चंद्रास्त – 09:21:16 AM

  • चंद्रराशी – मिथुन

  • ऋतु – हेमंत

हिंदू मास आणि वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह (अमान्ता) – मृगशिरा

  • माह (पूर्णिमांत) – पौष

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 04:06:17 PM ते 05:25:30 PM

यमघंट काल – 12:08:40 PM ते 01:27:52 PM

गुलिकाल – 02:47:05 PM ते 04:06:17 PM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त- 11:47:00 AM ते 12:29:00 PM

कोणत्या राशींसाठी ठरणार आजचा दिवस लकी

मिथुन

चंद्र आज तुमच्या राशीत असल्याने दिवस विशेष अनुकूल असणार आहे. विचारशक्ती, संवाद आणि कामकाजात चांगला फायदा येणार आहे. जुने अडथळे दूर होणार आहेत.

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींना आज मानसिक शांतता आणि कामातील स्थैर्य मिळू शकणार आहे. घरगुती कामात समाधान मिळणार आहे.

तूळ

तूळ राशींसाठी हा दिवस लाभदायक ठऱणार आहे. अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत. नवीन संधी किंवा प्रस्ताव मिळण्याची शक्यता जास्त.

मकर

मकर राशीच्या व्यक्तींना आज करिअरशी संबंधित चांगल्या बातम्या मिळू शकणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य, प्रयत्नांना योग्य फळ आणि आर्थिक लाभाची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : सासूचा ५ महिन्यांपूर्वी मृत्यू, नवरा राहायला परराज्यात; रिटायर नेव्ही अधिकाऱ्याची सूनेनं केली हत्या, त्या दिवशी भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: पुण्यात टोळक्याकडून कोयत्याने वाहनांची तोडफोड

BMC Election: BMC साठी भाजपकडून १३७ उमेदवारांची फायनल यादी जाहीर, वाचा कुणाला कुठून मिळाले तिकीट?

New Year 2026: भारताच्या ८ तास आधीच 'या' देशात नवीन वर्ष सुरू; जगभरात जल्लोषाला सुरुवात!

Happy New Year! ऐन वेळी स्टेटस शोधू नका; 'इथे' वाचा WhatsApp-Facebook साठी मराठी, हिंदी आणि English शुभेच्छा मेसेज

SCROLL FOR NEXT