Today's lucky zodiac signs saam tv
राशिभविष्य

Lucky zodiac signs: कार्तिक कृष्ण षष्ठीत चार राशींना लाभ; आत्मविश्वास आणि आर्थिक सुधारणा दिसणार

Kartik Krishna Shashthi benefits for zodiac signs: हिंदू पंचांगानुसार, आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी ही सकारात्मक ऊर्जा आणि साहस प्रदान करणारी मानली जाते.

Surabhi Jayashree Jagdish

आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची षष्ठी तिथी आहे. हा दिवस शांततेने कामं पूर्ण करण्यासाठी अनुकूल मानण्यात येतो. यावेळी चंद्र मिथुन राशीत आहे. त्यामुळे संवाद, बोलणी, व्यापार आणि मानसिक चपळता या गोष्टींना चालना मिळू शकणार आहे.

शरद ऋतूमुळे मनात हलकेपणा आणि विचारांमध्ये स्पष्टता जाणवण्याची शक्यता आहे. घरगुती कामं, कुटुंबीयांसोबत संवाद आणि दैनंदिन नियोजन व्यवस्थित करण्यासाठी आजचा दिवस योग्य मानला जातोय.

आजचं पंचांग तपशील

  • तिथि: कृष्ण षष्ठी

  • नक्षत्र: पुनर्वसु

  • करण: गर

  • पक्ष: कृष्ण पक्ष

  • योग: साध्य (11:53:42 AM पर्यंत)

  • वार: सोमवार

  • सूर्योदय: 06:19:10 AM

  • सूर्यास्त: 05:16:55 PM

  • चंद्र उदय: 10:04:29 PM

  • चंद्रास्त: 11:22:59 AM

  • चंद्र राशि: मिथुन

  • ऋतु: शरद

  • शक संवत्: 1947

  • विक्रम संवत्: 2082

  • माह (अमान्ता): कार्तिक

  • माह (पुर्निमान्ता): मृगशिरा

अशुभ काल

  • राहुकाल: 07:41:23 AM ते 09:03:36 AM

  • यमघंट काल: 10:25:49 AM ते 11:48:00 AM

  • गुलिकाल: 01:10:16 PM ते 02:32:29 PM

शुभ मुहूर्त

  • अभिजीत मुहूर्त: 11:27:00 AM ते 12:09:00 PM

आजचा दिवस या चार राशींसाठी ठरणार लकी

मिथुन राशी

चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास आणि संवादकला तेजीत राहणार आहे. यावेळी महत्त्वाची बोलणी तुमच्या फायद्याची ठरू शकणार आहेत. कामात गती येणार आहे. नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत.

तूळ रास

आजचा दिवस संतुलित असणार आहे. कुटुंबीयांसोबत सौहार्द वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या मताला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता आहे.

धनु रास

प्रवास, बाहेरील कामं किंवा संपर्क यामध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. अडकलेली कामं येत्या काळात पुढे सरकणार आहेत. वरिष्ठांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता अधिक आहे. निर्णय क्षमता मजबूत राहणार आहे.

मीन रास

घरातील वातावरण आनंददायी राहण्यास मदत होणार आहे. येत्या काळात धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे मन राहणार आहे. आर्थिक बाजू स्थिर राहणार आहे. आरोग्य सुधारण्याचे संकेत आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या जवळच्या सहकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल, धनंजय मुंडेंचेही कनेक्शन?

Maharashtra Live News Update : संजय राऊत यांना आज मिळणार डिस्चार्ज

Indurikar Maharaj Name: इंदुरीकर महाराजांचं खरं नाव काय? कोणालाच माहित नाही

Skin Care: लग्न सोहळ्यात सगळ्यात उठून दिसायचं आहे? मग फॉलो करा 'हे' घरगुती स्किन केयर टिप्स

पुण्यात शिंदे सेनेला नव्या भिडूची साथ; फडणवीस - पवार यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, युतीची घोषणा

SCROLL FOR NEXT