Guru Ast 2025 saam tv
राशिभविष्य

Guru Asta: जून महिन्यात गुरु ग्रहाचा होणार अस्त; 'या' राशींच्या नशीबाचं टाळं उघडणार, मिळणार पैसे

Guru Asta 2025: ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनुसार राशी बदल करतात. मात्र काही ग्रह असे आहेत जे अस्त आणि उदय देखील होतात. यामध्ये गुरु ग्रहाचा देखील समावेश आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठरलेल्या वेळी त्याच्या राशीमध्ये बदल करतो. या ग्रहांमध्ये गुरु हा सर्वात शुभ आणि महत्त्वाचा ग्रह मानला जातो. गुरुच्या स्थितीमध्ये छोटा बदल देखील प्रत्येक राशीच्या जीवनावर काही ना काही परिणाम करतो. यामध्ये गुरु उदय आणि अस्त देखील होतो.

गुरु सुमारे १ वर्षानंतर मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांचा गुरु १२ जून रोजी संध्याकाळी ७:३७ वाजता या राशीत अस्त होणार आहे. सुमारे २७ दिवस अस्त राहिल्यानंतर ९ जुलै रोजी त्याचा उदय होणार आहे. मिथुन राशीत गुरूची अस्त स्थिती काही राशींनासाठी लाभदायक ठरणार आहे. यावेळी कोणत्या राशींना पैसे मिळणार ते पाहूयात.

मेष रास

या राशीच्या लोकांसाठी, गुरु ग्रहाची अस्त खूप अनुकूल ठरणार आहे. आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या संपणार आहेत. अनावश्यक प्रवासापासूनही आराम मिळण्याची शक्यता आहे. भावंडांसोबत संबंध चांगले राहणार आहेत. तुम्ही करत असलेल्या कामात तुम्हाला खूप यश मिळणार आहे.

धनु रास

गुरू मिथुन राशीमध्ये अस्त होणार आहे. या राशीच्या लोकांवर अनेक प्रकारे अनुकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. धार्मिक यात्रेवर जाण्याचा योग आहे. शत्रूंपासून मुक्तता मिळू शकतो. तुमचा आत्मविश्वास वेगाने वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनेक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे.

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचा अस्त फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांच्या जीवनात चांगले परिणाम दिसून येणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. आर्थिक परिस्थितीही चांगली राहणार आहे. दीर्घकाळापासून असलेली पैशाची टंचाई दूर होण्याची शक्यता आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. कोर्टाच्या केसेसमध्ये तुम्हाला फायदा होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विखे पाटलांचा आणि त्यांचा घराण्याचा आरक्षणाशी संबंध नाही लक्ष्मण हाकेंची जहरी टीका

Onion Ban: कांदा न खाण्याची अनोखी परंपरा! भारतातील 'या' ठिकाणी कांदा खात नाहीत

Bihar Election : बिहारमध्ये भाजप सत्तेत येणार, शरद पवारांच्या आमदाराने सांगितले गणित

महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भयंकर घडलं; माजी क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू

Swara Bhaskar: 'सर मला फिल्ममध्ये...'; सलमान खानच्या 'या' चित्रपटात स्वरा भास्करला व्हायचं होत हिरोईन, पण निर्मात्याने...

SCROLL FOR NEXT