Guru Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Guru Gochar: गुरू करणार बुध ग्रहाच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या व्यक्ती होणार मालामाल

Guru Gochar 2025 Jupiter Planet Transit In Mithun: गुरु बृहस्पति सुमारे 13 महिन्यांनंतर आपली राशी बदलतो. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींचं नशीब चमकणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन करतो. नव ग्रहापैकी प्रत्येक ग्रहाच्या गोचरचा महत्त्व देण्यात आलंय. गुरु बृहस्पति सुमारे 13 महिन्यांनंतर आपली राशी बदलतो. गुरुच्या राशी बदलाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसतो.

गुरु बृहस्पति सध्या वृषभ राशीमध्ये भ्रमण करतोय. बृहस्पती पुढच्या वर्षी मे महिन्यात पर्यंत वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्यावर बुध ग्रहाचे वर्चस्व आहे. यामुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळू शकणार आहे. यावेळी काही राशींना चांगली नोकरी मिळू शकते. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींचं नशीब चमकणार आहे.

कन्या रास

गुरूचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. बँक बॅलन्स वाढू शकतो. ऑफिसमध्ये तुमच्या वागण्यामुळे सर्वजण तुम्हाला मदत करतील. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो.

वृषभ रास

गुरूचं गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकणार आहे. व्यावसायिकांना अडकलेले कर्जाचे पैसे मिळू शकतात. तुमच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होऊ शकणार आहे.

तूळ रास

बृहस्पतिच्या राशीतील बदल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात नशीब तुम्हाला साथ देणार आहे. गुंतवणुकीचा विचार करत फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी मोठा प्रवास करू शकता. धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार आहात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT