Guru Vakri 2024 Kark Rashi saam tv
राशिभविष्य

Guru Vakri: गुरु ग्रहाची वक्री चाल या राशींना करणार मालामाल; बृहस्पतिच्या आशीर्वादाने मिळणार पैसा

Guru Vakri 2024 Kark Rashi : काही ग्रह राशीमध्ये बदल करण्यासोबत वक्री चाल देखील चालतात. गुरू ग्रह 9 ऑक्टोबर रोजी वक्री चाल चालणार असून यावेळ कोणत्या राशींसाठी या काळात चांगले दिवस असणार आहेत, ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या राशीमध्ये एका ठराविक कालावधीनंतर बदल करतात. यावेळी काही ग्रह राशीमध्ये बदल करण्यासोबत वक्री आणि मार्ग्रस्थ होतात. ग्रहांच्या अशा हालचालीचा परिणाम देखील सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो.

गुरू ग्रह 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:01 पासून वृषभ राशीत वक्री चाल चालणार आहे. यावेळी ज्योतिष्य शास्त्रानुसार, पुढील वर्षात 5 फेब्रुवारीपर्यंत गुरु ग्रह या स्थितीत भ्रमण करणार आहे. गुरु ग्रहाची ही स्थिती काही राशींसाठी लाभदायक ठरणार असून कोणत्या राशींसाठी या काळात चांगले दिवस असणार आहेत, ते पाहूयात.

मिथुन रास

गुरु ग्रहाची वक्री चाल या राशींच्या व्यक्तींसाठी अगदी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होणार आहात. तुम्हाला नवीन संधी मिळणार असून हा काळ तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढवणार आहे. व्यवसायात गुंतवलेले पैसे आता परत मिळू शकतात. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचं चांगली बातमी मिळणार आहे.

कर्क रास

गुरू ग्रहाची वक्री चाल या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. उत्पन्नाच्या संधी आणि नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होऊ शकणार आहेत. बिझनेसमध्ये तुम्हाला प्रचंड फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होणार आहात.तुमच्या बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होणार आहे.

वृश्चिक रास

गुरूची वक्री चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. विवाहित लोकांच्या आयुष्यात नव्याने आनंद येणार आहे. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्याच्या संधीही मिळतील. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकणार आहेत. स्वतःचा नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपुरात सकल ओबीसी समाजाचा उद्या महामोर्चा निघणार

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

Solapur : शेताच्या बांधावरून वाद; शेतकऱ्याने रागातून २०० केळीची झाडे केली उध्वस्त

SCROLL FOR NEXT