Budh Uday And Mangal Margi saam tv
राशिभविष्य

Lucky zodiac sign: 5 जून राशींपासून 3 राशी होणार मालामाल; गुरु-शुक्राच्या लाभ दृष्टीने होणार धनलाभ

Shukra Guru Yog: शुक्र आणि गुरु यांच्यामध्ये निर्माण होणारा योग प्रत्येक कामात यश मिळवून देणार आहे. यावेळी तुम्हाला आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी इतर ग्रहांशी युती करतात. ग्रहांच्या या युतीचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो. येत्या काळात नवग्रहांमधील दोन ग्रहांची युती होणार आहे. ५ जून रोजी शुभ ग्रह शुक्र आणि गुरु एकमेकांपासून ६० अंशांच्या कोनीय स्थितीत असणार आहेत. या दोन्ही ग्रहांच्या या कोनीय संयोजनाला लाभ योग किंवा लाभ दृष्टी योग म्हणतात.

या दोन्ही ग्रहांच्या फायदेशीर पैलूंमुळे काही राशींचं नशीब चमकू शकणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना अचानक आर्थिक लाभासह प्रगतीची संधी मिळणार आहे. यावेळी कोणत्या राशींना चांगला लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

धनु रास

गुरु आणि शुक्र ग्रहाची शुभ दृष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात नोकरीत पदोन्नती आणि व्यवसायात नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. यावेळी नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी देखील हा एक उत्तम काळ असणार आहे. या कालावधीत, कोणतेही प्रलंबित पेमेंट मिळू शकणार आहे. तुमच्यासाठी याकाळात पैशाचा नवीन स्रोत निर्माण होऊ शकतो.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी गुरु आणि शुक्र यांचा फायदेशीर पैलू सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढू शकणार आहे. या काळात बेरोजगारांना नोकरी मिळू शकणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी गुरु आणि शुक्र ग्रहाची युती लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला व्यावसायिक भागीदारीतून फायदा होणार आहे. यावेळी अभ्यास आणि करिअरमध्ये यश मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला इतरांचं सहकार्य मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

Mega Block : ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल होणार, रविवारी मध्य-हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक; पाहा वेळापत्रक

Ajit Pawar Slams Laxman Hake: विनाशकाले विपरीत बुद्धि! मी त्याला किंमत देत नाही; अजित पवार संतापले|VIDEO

Health Tips: दात घासल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये?

Manoj Jarange Patil : सरकारने भंगार खेळ खेळणं बंद करावं, आरक्षण देऊन टाकावं; आझाद मैदानातून मनोज जरांगे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT