Today's lucky zodiac signs saam tv
राशिभविष्य

Zodiac signs: आजचा दिवस शुभ की आव्हानात्मक? या ४ राशींना मिळणार अनपेक्षित लाभ

zodiac signs auspicious day astrology: ज्योतिषांच्या मते, आजचा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. ग्रहस्थितीतील बदलामुळे या राशींना अचानक लाभ, आर्थिक प्रगती आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज 4 डिसेंबर 2025 गुरुवारचा दिवस हेमंत ऋतुतील शांत वातावरण घेऊन आला आहे. आजची शुक्ल चतुर्दशी तिथी धार्मिक कार्यांसाठी विशेष मानण्यात येते. यावेळी चंद्र आज वृष राशीत भ्रमण करतोय. यामुळे स्थैर्य, धैर्य आणि आर्थिक बाबींमध्ये सकारात्मकता दिसू शकते. शुभ कार्य, गृहकृत्य, पूजापाठ आणि दीर्घकालीन निर्णयांसाठी आजचा दिवस अनुकूल मानण्यात येतोय.

आजचं पंचांग

  • तिथी – शुक्ल चतुर्दशी

  • नक्षत्र – कृतिका

  • करण – वणिज

  • पक्ष – शुक्ल पक्ष

  • योग – शिव (12:35:00 PM पर्यंत)

सूर्य आणि चंद्र गणना

  • सूर्योदय – 06:49:43 AM

  • सूर्यास्त – 05:25:05 PM

  • चंद्रोदय – 04:38:01 PM

  • चंद्रास्त – 05:56:23 AM

  • चंद्रराशी – वृष

  • ऋतु – हेमंत

हिंदू मास आणि वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • अमान्ता मास – मृगशिरा

  • पूर्णिमांत मास – मृगशिरा

अशुभ मुहूर्त

  • राहु काल – 01:26:49 PM ते 02:46:14 PM

  • यमघंट काल – 06:49:43 AM ते 08:09:009 AM

  • गुलिकाल – 09:28:34 AM ते 10:47:59 AM

शुभ मुहूर्त

  • अभिजीत मुहूर्त – 11:46:00 AM ते 12:28:00 PM

कोणत्या राशींसाठी खास असणार आजचा दिवस?

वृषभ

आज चंद्र तुमच्या राशीत असल्याने स्थिरता आणि आत्मविश्वास वाढणार आहे. आर्थिक लाभ, कामातील प्रगती होण्याची चिन्ह आज दिसून येतायत. महत्त्वाचे निर्णय घेतल्यास त्याचा फायदा पुढील दिवसांत मिळू शकतो.

कन्या

तुमच्या कामामध्ये तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. अडकलेली कामं पुन्हा सुरु होऊ शकतात. वरिष्ठांकडून कौतुक आणि विद्यार्थ्यांना चांगला लाभ मिळेल. आरोग्यही चांगले राहणार आहे.

मकर

धनलाभ, वाढीव जबाबदारी आणि नाव-प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. कौटुंबिक वातावरणात शांतता राहणार आहे.

मीन

मानसिक समाधान, सर्जनशील कामांमध्ये प्रगती आणि घरातील सौहार्द आज तुम्हाला भाग्यवान बनवणार आहे. आर्थिक नियोजनासाठी आणि नवीन सुरुवातीसाठी दिवस योग्य आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha Kapoor Viral Video : श्रद्धा कपूरनं रूमर्ड बॉयफ्रेंड राहुल मोदीला सर्वांसमोर प्रेमाने घास भरवला, VIDEO होतोय व्हायरल

PM Kisan Yojana: महत्त्वाची बातमी! ३२२४ शेतकऱ्यांना मिळणार नाहीत ₹२०००; यवतमाळनंतर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वगळले

Mumbai : फ्लॅट देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधींना लुटलं, मुंबईतील बड्या बिल्डरचा कारनामा उघड

Shocking: सुंदर मुलांना पाहून यायचा राग, पाण्यात बुडवून करायची हत्या; महिलेने चौघांना संपवलं, पोटच्या मुलालाही सोडलं नाही

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT