Shani Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Shani Gochar 2025: नव्या वर्षात 'या' राशींना मिळणार शनीच्या साडेसातीपासून मुक्ती; जगणार राजासारखं आयुष्य

Shani Gochar 2025: शनी एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. त्यामुळे एका राशीत परत येण्यासाठी त्याला 30 वर्षे लागतात.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक वेळेनुसार, ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात, असं वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. निकाल देणारा आणि न्यायाचा देव शनि 2025 मध्ये आपली राशी बदलणार आहे. शनी एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. त्यामुळे एका राशीत परत येण्यासाठी त्याला 30 वर्षे लागतात.

शनी सुरुवातीला त्याच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत विराजमान होणार आहे. मात्र मार्च 2025 मध्ये तो आपली राशी बदलून मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीदेव 29 मार्च 2025 रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी काही राशींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत. जाणून घेऊया यामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

मकर रास

शनी मीन राशीत प्रवेश केल्यानंतर या राशीच्या तिसऱ्या घरात स्थित असणार आहे. शनीच्या राशी बदलाने या राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळणार आहे. या राशींच्या व्यक्तींचं परदेश प्रवासाचे स्वप्नही पूर्ण होऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे भविष्यात तुम्हाला याचा फायदा मिळू शकणार आहे. जर तुम्ही हुशारीने काम केलं तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी भरपूर यश मिळू शकणार आहे.

कुंभ रास

या राशीमध्ये शनि दुसऱ्या घरात स्थित असणार आहे. या राशीच्या लोकांना बंपर लाभ मिळण्याची शक्यता असून तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात फायदा होणार आहे. तुमच्या मेहनतीतून तुम्ही चांगले पैसे कमावू शकता. परदेशात काम करणाऱ्या लोकांनाही बरेच फायदे मिळू शकतात. या काळात मालमत्तेची खरेदी-विक्री करून तुम्ही भरपूर नफा कमवू शकता.

वृषभ रास

या राशीच्या अकराव्या घरात शनि असेल. नवव्या आणि दहाव्या घराचा स्वामी शनि असल्याने मीन राशीत प्रवेश करणे फायदेशीर ठरू शकते. नोकरदार लोकांसाठी हा कालावधी चांगला असू शकणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमचा वेळ चांगला जाणार आहे. दीर्घकाळ चाललेल्या समस्या आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राहूनही तुम्हाला बढती मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

SCROLL FOR NEXT