Horoscope Saam Tv
राशिभविष्य

2025 Horoscope: नव्या वर्षात शुक्रामुळे तयार होणार मालव्य राजयोग; 'या' राशींची होणार भरभराट

2025 Horoscope: आगामी वर्षात ग्रहांमुळे अनेक विशेष योग आणि राजयोग तयार होणार आहेत. यामुळे सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर व्यापक प्रभाव पडणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

जोतिष्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, येणारं वर्ष ग्रह ताऱ्यांच्या दृष्टीने खूप खास असणार आहे. आगामी वर्षात ग्रहांमुळे अनेक विशेष योग आणि राजयोग तयार होणार आहेत. यामुळे सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर व्यापक प्रभाव पडणार आहे. 2025 मध्ये, शुक्र ग्रह जानेवारी महिन्यात मीन राशीत प्रवेश करणार आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी शुक्र कुंडलीच्या पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि दहाव्या घरात, वृषभ, तूळ किंवा मीन राशीत असतो, त्यावेळी मालव्य राजयोग तयार होतो.पंचमहापुरुष राजयोगातील हा सर्वात महत्वाचा राजयोग असून या राजयोगाच्या निर्मितीचा काही राशीच्या लोकांच्या जीवनावर खूप सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

तूळ रास

शुक्राच्या मालव्य राजयोगामुळे तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी मिळू शकणार आहेत. पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. अचानक हाती पैसे येणार आहेत.

वृषभ रास

या राजयोगाच्या निर्मितीमुळे नोकरीतून पैसे मिळवण्याच्या प्रयत्नांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. नवी नोकरी मिळू शकणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकणार आहे.आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. जीवनसाथीसोबतचे संबंध सौहार्दाचे राहतील.

मीन रास

शुक्राच्या मालव्य राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे मीन राशीच्या लोकांना इच्छित नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. कामाच्या क्षेत्रात करिअर करण्याच्या चांगल्या संधी मिळतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महापालिकेसाठी भाजपचा नवा प्लॅन, ठाकरेंच्या रणनीतीला भाजपचा शह?

Maharashtra Corporation Election: मोठी बातमी! आमदार, खासदारांच्या पोरांना तिकीट नकोच; ऐननिवडणुकीत भाजपचा निर्णय

राज ठाकरेंच्या मनसेच्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर, कोणाला कुठून संधी?

Kala Vatana Rassa Recipe: काळा वटाणा रस्सा भाजी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीच्या चर्चेत ट्विस्ट

SCROLL FOR NEXT