Januray 2026 Gochar SAAM TV
राशिभविष्य

Januray 2026 Gochar: जानेवारीत मकरसह ३ राशी होणार मालामाल; 4 ग्रह करणार त्यांच्या राशीत बदल

January zodiac signs: ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी महिन्यात ग्रहांची मोठी हालचाल होणार आहे. या महिन्यात ४ ग्रह आपले स्थान बदलणार असून त्याचा थेट परिणाम काही राशींवर होईल.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, दर महिन्याला कोणते-ना कोणते ग्रह त्यांच्या राशीत बदल करतात. आता येत्या काही दिवसांत नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी ग्रहांच्या हालचाली बदलतात तेव्हा त्याचा मानवी जीवनावर होत असतो. ग्रहांच्या गोचरचे शुभ परिणाम एखाद्या व्यक्तीच्या समस्या कमी करू शकतात, तर अशुभ परिणाम आनंदी जीवनावर सावली टाकू शकतात.

जानेवारी महिन्यात मंगळ, बुध, शुक्र आणि सूर्य हे चार प्रमुख ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार आहेत. त्याच्या कोणत्या राशींवर चांगला परिणाम होणार आहे ते पाहूयात.

शुक्र गोचर २०२६

१३ जानेवारी रोजी पहाटे ४:०२ वाजता शुक्र शनीच्या राशी मकर राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र आणि शनि यांच्यात मैत्री आहे.

सूर्य गोचर २०२६

ग्रहांचा राजा सूर्य १४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३:१३ वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे. या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे.

मंगळ गोचर २०२६

ग्रहांचा अधिपती मंगळ १६ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ४:३६ वाजता मकर राशीत प्रवेश करेल. मंगळ मकर राशीत उच्च आहे, त्यामुळे मकर राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो.

बुध गोचर २०२६

ग्रहांचा राजा बुध १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:३७ वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ याठिकाणी आधीच उपस्थित असणार आहे.

कोणत्या राशींना होणार फायदा?

मकर

नवीन वर्षाचा पहिला महिना मकर राशीच्या लोकांसाठी आशीर्वाद देणारा असणार आहे. हा काळ नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी अनुकूल असेल. गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे.

मेष

मेष राशीसाठी नवीन वर्ष आनंद घेऊन येणार आहे. जानेवारीमध्ये ग्रहांची जुळवाजुळव तुमच्या व्यावसायिक जीवनाला फायदेशीर ठरू शकणार आहे. ज्यामध्ये नवीन प्रकल्प आणि चांगल्या नोकरीच्या ऑफर यांचा समावेश असेल.

वृषभ

तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील. नशीब तुमच्या बाजूने असेल आणि तुम्हाला चांगली बातमी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्षणीय फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात महाविकास आघाडीच ठरलं! काँग्रेस, शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार

Pimple Free Skin: चेहरा पिंपल्सने भरलाय? 'या' 5 घरगुती टिप्सने लगेचच करा उपाय

Breast Cancer: नाईट शिफ्ट, नियमित प्रवास ठरू शकतो गंभीर आजाराला निमंत्रण, ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता

Famous Director Accident : शूटिंगदरम्यान मोठा अपघात; जखमी अवस्थेत प्रसिद्ध दिग्दर्शकाला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! BMC साठी भाजपकडून ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणा-कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT