Shani Gochar saam tv
राशिभविष्य

Shani Gochar: 9 दिवसांनी शनी चाल बदलणार; 'या' 3 राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु, तिजोरी पैशांनी तुडुंब भरणार

Shani Rashi Parivartan 2025: शनी सध्या त्यांच्या स्वगृही कुंभ राशीत स्थित आहेत. मात्र, या महिन्याच्या शेवटी, म्हणजेच 29 मार्चला, शनी मीन राशीत प्रवेश करणार आहेत. या मोठ्या ग्रह बदलामुळे काही राशींचे नशीब उजळणार आहे. विशेषतः, काही राशींना मोठा आर्थिक लाभ होण्याची संधी आहे

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव सुमारे अडीच वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात. ज्योतिष्य शास्त्रात सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह हा शनी मानला जातो. शनीला एका राशीत प्रवेश करण्यासाठी अंदाजे 30 वर्षे लागतात.

शनिदेव सध्या त्यांच्या मूलत्रिक राशी कुंभ राशीत भ्रमण करतायत. या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच २९ मार्च रोजी शनी मीन राशीत भ्रमण करणार आहेत. ज्यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. या राशींच्या उत्पन्नात वाढ आणि नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. शनी देवाच्या गोचरमुळे कोणत्या राशींच्या जीवनात पैसा येणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

मीन राशीतील शनिदेवाचं भ्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. शनिदेव तुमच्या गोचर कुंडलीच्या ११ व्या घरात भ्रमण करणार आहेत. या काळात तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमच्या आयुष्यात प्रगतीचे नवीन मार्ग उघडणार आहेत. या काळात गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचं भ्रमण अनुकूल ठरू शकणार आहे. शनिदेव तुमच्या करिअर आणि व्यवसायाच्या ठिकाणी भ्रमण करणार आहेत. या काळात नोकरी शोधणाऱ्या लोकांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.

धनु रास

शनिदेवाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमच्या सुखसोयी आणि सुविधा वाढणार आहेत. तुम्हाला वाहन आणि मालमत्तेचे सुख देखील मिळू शकते. तिथे तुम्हाला समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. शनिदेव तुमच्या राशीतील तिसऱ्या भावात आणि धनाचा स्वामी आहे. तुमचं धैर्य आणि शौर्य वाढणार आहे. तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात इतका धुव्वाधार पाऊस पडतोय कसा? पुढील 4 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे!

Panvel Election: पनवेल विधानसभेत ८५ हजार दुबार मतदार, खोपोलीनंतर पनवेलमधील घोळ उघड

School Holiday : मुसळधार पावसाचा अलर्ट! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूरमधील शाळांना उद्या सुट्टी

Best Elections : बेस्ट निवडणुक कोण जिंकणार? ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी

Tuesday Horoscope : काहींना शत्रू त्रास देतील, तर काहींची होईल प्रगती; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT