Mangal Vakri saam tv
राशिभविष्य

Mangal Vakri: ४ दिवसांनी मंगळ चालणार उल्टी चाल; व्यवसायात होणार दुप्पट लाभ, रिकामी तिजोरी भरणार

Mangal Vakri 2025: काही ग्रह गोचर प्रमाणे वक्री आणि मार्गस्थ देखील होतात. सध्या मंगळ ग्रह कर्क राशीत स्थित असून तो वक्री चाल चालणार आहे. मंगळवार, 21 जानेवारी रोजी सकाळी 9:37 वाजता मंगळ वक्री चालीने कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो. काही ग्रह गोचर प्रमाणे वक्री आणि मार्गस्थ देखील होतात. यामध्ये मंगळ ग्रहाचा देखील समावेश आहे. येत्या काळात मंगळ ग्रह त्याची वक्री चाल चालणार आहे.

सध्या मंगळ ग्रह कर्क राशीत स्थित असून तो वक्री चाल चालणार आहे. मंगळाच्या वक्री चालीचा 12 राशीच्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकणार आहे. मंगळवार, 21 जानेवारी रोजी सकाळी 9:37 वाजता मंगळ वक्री चालीने कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर 3 एप्रिल 2025 रोजी मंगळ पुन्हा कर्क राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाच्या या वक्री चालीचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर शुभ परिणाम आहे ते पाहूयात.

मेष रास

मंगळाची वक्री गती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमचं धैर्य वाढू शकतं. योजना आणि उद्दिष्टांवर सकारात्मक परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. भविष्यातील योजना साकार होतील. मंगळ हा तुमच्या राशीचा स्वर्ग आणि भाग्यस्थानाचा स्वामी आहे. तुमच्या घरात आनंदाचं वातावरण राहणार आहे. अशा सहलींची शक्यता आहे ज्यामुळे मानसिक शांती मिळू शकणार आहे.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी मंगळाची वक्री चाल तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. यावेळी नशीब तुमच्या बाजूने असू शकणार आहे. या काळात तुम्ही काम किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. या काळात उत्पन्न वाढणार आहे. तुम्ही पैशाशी संबंधित अनेक निर्णय घेणार आहात. या काळात तुम्ही कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

मिथुन रास

मंगळाची वक्री चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. कारण मंगळ तुमच्या राशीत उलट फिरणार आहे. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे. जोडीदारासोबतचं नातं अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लाभ होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती

Crime News: शिवरस्त्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना दाखवली पिस्तूल; चक्क पोलिसांसमोरच धमकावलं| व्हिडिओ व्हायरल

मध्य रेल्वेच्या आणखी एका रेल्वे स्टेशनचे नाव बदलले; आता नवीन नाव काय?

Amla Murabba Recipe: थंडीत आवळा मुरंबा कसा बनवायचा?

Sakal Survey: महायुती सरकार ठरलं अव्वल! कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात पायाभूत सुविधांवर झालं सर्वाधिक काम?

SCROLL FOR NEXT