Lucky zodiac signs saam tv
राशिभविष्य

January 17 Panchang: आजचा दिवस कसा जाईल? जाणू घ्या १७ जानेवारी पंचांग, शुभ-अशुभ काळ आणि राशीविशेष

January 17 Panchang auspicious inauspicious times zodiac predictions: आज शनिवार, १७ जानेवारी २०२६ रोजीचा पंचांग महत्त्वाचा आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी असून ती रात्री १२:०४ पर्यंत राहणार आहे

Surabhi Jayashree Jagdish

आज १७ जानेवारी २०२६ असून माघ महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी आणि शनिवार आहे. शनिवारी एका लोखंडी भांड्यात मोहरीचे तेल भरा. आता, त्यात तुमचा चेहरा पहा आणि ते तेल एखाद्या गरिबाला दान करा. हा उपाय तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर करण्यास आणि प्रगतीतील अडथळे दूर करण्यास मदत करणार आहे.

आजचा हा दिवस कोणत्या राशींसाठी हा दिवस शुभ किंवा अशुभ आहे ते पाहुयात. या दिवसाचा शुभ काळ, अशुभ काळ, राहुकाल, ग्रहांची स्थिती आणि विशेष उपाय देखील जाणून घेऊया.

आजचं पंचांग

  • तिथि – कृष्ण चतुर्दशी

  • नक्षत्र – पूर्वाषाढा

  • करण – विष्टि

  • पक्ष – कृष्ण पक्ष

  • योग – व्याघात (रात्री 09:05:37 पर्यंत)

  • दिन – शनिवार

सूर्य एवं चंद्र गणना

  • सूर्योदय – 06:53:10 AM

  • सूर्यास्त – 05:35:34 PM

  • चंद्र उदय – 05:48:22 AM

  • चंद्रास्त – 04:10:12 PM

  • चंद्र राशि – धनु

  • ऋतु – शिशिर

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह (अमान्ता) – पौष

  • माह (पूर्णिमान्ता) – माघ

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 09:33:46 AM ते 10:54:04 AM

यमघंट काल – 01:34:40 PM ते 02:54:58 PM

गुलिकाल – 06:53:10 AM ते 08:13:28 AM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:53:00 AM ते 12:35:00 PM

आजच्या चार शुभ राशी

धनु

चंद्र तुमच्या राशीत असल्याने आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. महत्त्वाचे निर्णय, नियोजन आणि भविष्यासंबंधी विचार करण्यासाठी योग्य वेळ आहे.

मेष

धनु राशीतील चंद्रामुळे तुमच्यात उत्साह आणि धाडस वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी नवे प्रयोग करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

सिंह

आजचा दिवस नेतृत्वगुण दाखवण्यासाठी अनुकूल आहे. जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्या तुम्ही आत्मविश्वासाने पार पाडू शकणार आहे. वरिष्ठ किंवा कुटुंबातील व्यक्तींकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ

विचारांची दिशा स्पष्ट होणार आहे. एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याचा आत्मविश्वास येणार आहे. आर्थिक किंवा व्यावसायिक बाबतीत सावधपणे पुढे गेल्यास फायदा होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

SCROLL FOR NEXT