Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : मिथुनसह 5 राशीच्या लोकांना सुखद धक्का मिळणार, तर कोणाला मिळेल प्रेमात यश; तुमची रास कोणती?

Horoscope Today in mararthi : आज मिथुनसह ५ राशींच्या लोकांना सुवार्ता मिळणार आहे. तर काहींना सुखद धक्का मिळणार आहे. तर काही राशीच्या लोकांना प्रेमात यश मिळेल.

Anjali Potdar

आजचे पंचांग

सोमवार,१० फेब्रुवारी २०२५,माघ शुक्लपक्ष,सोमप्रदोष.

तिथी- त्रयोदशी १८|५८

रास- मिथुन ११|५७ नं.कर्क

नक्षत्र- पुनर्वसु

योग- प्रीतियोग

करण- तैतिल

दिनविशेष- उत्तम दिवस

मेष - धाडस आणि साहस या गोष्टी आपल्यासाठी आवडीच्या आहेत. अशाच काही गोष्टी आज कराल. त्यामध्ये यश मिळेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभल्यामुळे एक वेगळा आत्मविश्वास वाढेल.

वृषभ- पैसा आणि आपली रास याचे खूप योग्य समीकरण आहे. आज याच गोष्टींमध्ये म्हणजे आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभणार आहे. जुनी दिलेली येणी सहजगत्या आज वसूल होतील.

मिथुन - आयुष्यामध्ये ठरवून गोष्टी होत नाहीत पण बऱ्याच वेळा सहज आणि नकळत गोष्टी घडतात. आज अशाच काही सुवार्ता व सुखद धक्के कानी येतील. उत्साह आणि उमेद वाढवणाऱ्या घटना घडणार आहेत.

कर्क -अडचणी आल्याशिवाय सुखाचे दिवस कळत नाहीत आणि सुख असेल तर सहजगत्या जाणीव रहात नाही. दिवस त्रस्त राहील. वस्तू गहाळ होतील. आपसूकच अध्यात्माकडे पावले वळतील .

सिंह - मोलाचे क्षण आणि मोहाचे क्षण या दोन्हींमधला फरक आज ओळखावा लागेल. आपले मित्र-मैत्रिणी मोलाचे आहेत हे समजून घ्या. त्यांच्या सहवासा दिवस आनंदी जाईल. अनेक दिवस रखडलेले पत्र व्यवहार आज सहज होऊन जातील.

कन्या- तुमचे क्षेत्र उत्तरोत्तर बहरते आहे. आज यातच भर म्हणजे तुमच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. अनेक दिवस रखडलेली शासकीय कामे आज मार्गी लागतील.

तूळ - देवी उपासना आज फलदायी ठरेल. एखादी महत्त्वाची वार्ता कानावर येईल. मग ती नातवंडांची निगडित असेल किंवा नातेवाईकांची निगडित असेल. पण भाग्यकारक घटना घडतील. तुम्ही ठरवलेले घेतलेले निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.

वृश्चिक - बुद्धी आणि मन यांचा जसा 36 चा आकडा असतो. त्याचवेळी मानसिकता आणि आपली शरीर याही गोष्टी काही वेळेला एकत्रितरीत्या नांदत नाही. विनाकारण त्रास आणि कटकटी वाढतील. महत्त्वाची कामे वेळेत होणार नाही.

धनु- आपली मते आणि आपली कामे ठरवलेल्या गोष्टीत होण्याविषयी आग्रही राहाल. मात्र व्यावसायिक जोडीदाराचे योग्य सहकार्य मिळाल्यामुळे त्यामध्ये सुयश लाभेल.

मकर - आपली त्रस्तता नेहमी दुसऱ्यावर तुमच्याकडून निघते. आज वरिष्ठ लोकांबरोबर विनाकारण मतभेद होतील. आपल्या वाईटावर असणारे लोक यांच्याशी सुद्धा दोन हात करावे लागतील. काळजी घ्या.

कुंभ - संतती विषयीचे प्रश्न मार्गी लागतील. नवीन काहीतरी बुद्धीला चेतना देणाऱ्या गोष्टी तुमच्याकडून घडतील. त्या क्षेत्रात प्रगती होईल. शेअर्स आणि लॉटरीमध्ये धनाशी निगडित लाभ होईल.

मीन - गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येणार आहेत. इतरांवर तुमचा प्रभाव राहील. घरातल्या लोकांची कर्तव्य आज प्रेमाने पार पाडाल. घरी छोटे धार्मिक कार्य होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT