Horoscope Today 16th July 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today Marathi : पैशांचा मोठा खड्डा जाणवेल, मानसिक आरोग्य जपावे लागेल; जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस

Rashi Bhavishya in Marathi : पैशांचा मोठा खड्डा जाणवेल, मानसिक आरोग्य जपावे लागेल; तुमचा संपूर्ण दिवस कसा जाईल, याविषयी जाणून घ्या तुमचे संपूर्ण राशीभविष्य.

Anjali Potdar

>>आजचे पंचांग

मंगळवार दिनांक- १६ जुलै २०२४ आषाढ - शुक्लपक्ष. तिथी-दशमी.नक्षत्र-विशाखा.

योग -साध्य. करण - तैतिल.

रास तुला.

दिनविशेष-वर्ज्य दिवस

मेष- आज जोडीदाराबरोबर आनंद घेऊन आलेला दिवस आहे. आपण काही आखलेले प्लॅन आज सत्यामध्ये उत्तरतील. एकमेकांसाठी आयुष्य जगाल .दिवस चांगला राहील.

वृषभ - नातेवाईकांच्या कोणत्याही वादात पडू नका. त्याचे त्रास आम्ही येण्याची शक्यता आहे आजोळी चांगले संबंध असतील तर ते वृद्धिंगत होतील. नोकर आणि नोकरीच्या बाबतीत सावधानतेचा इशारा आहे.

मिथुन - आजचा दिवस प्रेम प्रणयासाठी सुसंधी आणि सहृदयता घेऊन आलेला आहे. नवीन नातेसंबंध प्रस्थापित करणे आणि आयुष्यामध्ये गुलाबी रंग भरण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. याचाच फायदा करून घ्या.

कर्क - विनाकारण त्रास कटकटी घरामध्ये वाढण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्या टाळण्यासाठी सर्वांशी सौहार्दाने वागा. तर दिवस चार चांगल्या गोष्टी पदरामध्ये टाकेल.

सिंह - भावंडांविषयी प्रेम वाढेल एकमेकांसाठी करण्याची जिद्दही असेल. ठरवलेल्या गोष्टी आज मार्गी लागतील आणि म्हणून दिवस सुखाचा राहील.

कन्या - सगळी नाती आपल्या प्रमाणे तोलून चालत नाहीत. काही वेळेला आपल्या बोलण्यामुळे कुटुंबीय दुखवते त्याची आज काळजी घ्या. सगळ्यांना सांभाळून बरोबर गेलात तर अनेक गोष्टी चांगल्या घडतील. पैसे मिळवण्यासाठी योग्य दिवस.

तूळ - आपणच आपल्या प्रेमात पडण्याचा अनेक संधी खूपदा येतात. त्यापैकीच आजचा दिवस आहे. एकूण सर्व गोष्टी इतरांना बरोबर घेऊन जाल. सुखाचा सागर आपल्याबरोबर येत आहे अशी भावना होईल.

वृश्चिक- काही गोष्टी या ठरवून होत नाहीत अचानक गंडांतर येतील. पैशाचा मोठा खड्डा जाणवेल विनाकारण खर्च होताना मानसिकता सुद्धा खराब होण्याची आज शक्यता आहे. त्याची काळजी घ्या.

धनु- नातेवाईकांचे उत्तम सहकार्य कामांमध्ये लाभेल. अनेक लाभ हातामध्ये येणार आहेत. जुन्या मित्रांच्या भेटीसाठी होऊन दिवसाची सुरुवात सुखद राहणार आहे.

मकर - सहकाऱ्यांची योग्य साथ मिळाल्यामुळे करिअरच्या ठिकाणी नावलौकिक मिळेल. प्रवासाचे योग येतील आणि त्यामधून अनेक फायदे होतील.

कुंभ - नातवंडांचे सौख्य आज लाभणार आहे. अनेक नवीन बातम्या कानावर येतील सामाजिक कार्यामध्ये हिरीरीने सहभागी होण्याचा आजचा दिवस आहे.

मीन - कष्टाला मर्यादा नसतेच. तेव्हा या गोष्टीचा विचार करून मनाचे तशी धाटनी बनवा. आज काम आणि कष्ट या दोन्ही गोष्टी ऐरणीवर राहणार आहेत आणि म्हणून आपण हातोडा बनवून जगले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

SCROLL FOR NEXT