Today Horoscope Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today: लग्नासाठी स्थळ येणार, नोकरीची संधी मिळणार; या ४ राशींसाठी गुरुवार ठरणार लकी

today horoscope financial and relationship predictions: आजचे राशीभविष्य वाचा आणि जाणून घ्या १२ राशींसाठी करिअर, आर्थिक स्थिती, प्रेम जीवन आणि आरोग्य कसं असणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

मेष रास

आजच्या दिवशी तुमच्या चिंता कमी होणार आहेत. तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी घरच्यांशी बोलू शकणार आहात. शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला प्रेम मिळू शकणार आहे.

वृषभ रास

आजच्या दिवशी तुम्ही स्वतःला कामांमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी हा योग्य काळ आहे. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकणार आहे. कौटुंबिक कार्यक्रमामुळे मोठा खर्च होऊ शकतो.

मिथुन रास

आजच्या दिवशी तुमच्यामध्ये वेगळीच ताकद असणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करू शकणार आहात. तुमच्या कुटुंबासाठीही वेळ काढा. या राशीच्या बेरोजगार लोकांना नोकरी शोधण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागणार आहेत.

कर्क रास

या राशीच्या लोकांनी आज सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण कोणीतरी तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. कठोर परिश्रमाचे चांगले परिणाम तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. लग्नाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

सिंह रास

आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. काही कारणास्तव वैवाहिक समस्या उद्भवू शकतात. मात्र आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. इतर लोकांशी चांगले संबंध निर्माण करणं तुमच्या फायद्याचं असणार आहे.

कन्या रास

आज तुम्हाला दीर्घकाळापासून असलेल्या आजारातून आराम मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला हवी असलेली साथ न मिळाल्याने नाराजी निर्माण होऊ शकते.

तूळ रास

आजच्या दिवशी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. काही कारणास्तव वैवाहिक समस्या उद्भवू शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रभावशाली लोकांशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठी तुम्ही सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं.

वृश्चिक रास

आजच्या दिवशी जुन्या समस्या पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. ज्यामुळे चिंता निर्माण होऊ शकते. पैसे उधार देताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. तुमच्या भविष्यातील योजनांबाबत सावधगिरी बाळगा.

धनु रास

स्वतःला सर्जनशील कामांमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी हा योग्य काळ आहे. आजच्या दिवशी समाजातून तुम्हाला सन्मान मिळण्याची शक्यता आहे.

मकर रास

आजच्या दिवशी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची दाट शक्यता आहे. काही कारणामुळे वैवाहिक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रभावशाली लोकांशी चांगले संबंध निर्माण होणार आहेत.

कुंभ रास

तुमचं आज एखाद्या गोष्टीमुळे विचलित होण्याची शक्यता आहे. तुम्हाला आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. तुमचे कठोर परिश्रम आणि संयम तुमच्या कामात यश आणतील.

मीन रास

आज तुमच्या कुटुंबासोबत तुमचे विचार शेअर केल्याने तुमच्या चिंता कमी होऊ शकतात. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आजचा योग्य अनुकूल नाही.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

Detox Water Benefits: वजन कमी करण्यासोबत पचनही सुधारायचं? आठवड्यातून ३ वेळा प्या हे टेस्टी डिटॉक्स वॉटर

Shiv Sena Symbol Hearing: शिवसेनाप्रमुख पद गोठवण्यात आलं; शिंदे गटाचा युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात काय झालं?

मराठा बांधव आक्रमक! पुणे-सातारा रस्ता अडवला; जोरदार घोषणाबाजी|VIDEO

लग्नाआधी वजन कमी करायचंय? मुलींनी नक्की फॉलो कराव्यात ‘या’ 5 टिप्स

SCROLL FOR NEXT