Horoscope Today 14 June 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : या राशींच्या मनासारख्या घटना घडतील, चांगल्या बातम्या येतील कानी; वाचा राशी भविष्य

Rashi Bhavishya 14 June 2024 : आज या राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील, तसेच चांगल्या बातम्या कानी येतील, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य....

Anjali Potdar

आजचे पंचांग - दिनांक १४ जून २०२४

वार - शुक्रवार. तिथी - ज्येष्ठ शुक्ल अष्टमी. नक्षत्र - उत्तरा. योग- सिद्धी. करण - विष्टी. रास - कन्या. दुर्गाष्टमी. दिनविशेष ११ नंतर चांगला.

मेष : मनस्थिती बिघडेल

"शिंगरू मेले हेलपाट्याने, घोडे गेले ओझ्याने" असा आजचा दिवस आहे. खूप काही ठरवून मनासारख्या गोष्टी होत नाहीत. उगाचच कामाचे ओझे मागे लागेल आणि मनस्थिती बिघडेल. इतरांच्या सांगण्यानुसार जाऊ नका मनाचा कौल घ्या.

वृषभ : उपासनेचे विशेष मिळेल

संततीच्या गोष्टी मनाप्रमाणे घडतील. कला, मनोरंजनामध्ये आजचा दिवस जाईल. उपासनेचे विशेष मिळणार आहे. त्यामुळे देवावर विश्वास ठेवा आणि पुढे चला.

मिथुन : प्रश्न मार्गी लागतील

राहत्या जागेचे प्रश्न, शेतीचे प्रश्न मार्गी लागतील. कुटुंबीयांबरोबर विशेष वेळ घालवाल. उगाचच मन दोलायमान होईल. पण आपला पाथ नेटाने चाला.

कर्क : चांगल्या बातम्या कानी येतील

भावंडांचे सौख्य ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे. कारण आपण सर्वांवर प्रेम करता. आजही सुख आपल्या पदरात पडणार आहे. पत्रव्यवहारातून काही चांगल्या बातम्या आपल्याला मिळतील.

सिंह : कुटुंबियांसाठी आधारस्तंभ आहात

आज अचानक आपण कुटुंबीयांसाठी आधारस्तंभ आहात असे तुम्हालाही जाणवेल आणि घरातील लोकांना सुद्धा आपली उदारता आणि पोशिंदेपणा या गोष्टी महत्वाच्या ठरतील. पैशांशी निगडित व्यवहार करण्यासाठी दिवस चांगला.

कन्या : व्यक्तिमत्व खुलून येईल

"दिल का आलम् मैं क्यां बताऊं तुम्हें" असा आजचा दिवस आहे. मनासारख्या गोष्टी घडणारच आहेत. सकारात्मकता राहिल. दिवसाचा आनंद लुटा. खरंतर स्वमग्न राहाल. आपले व्यक्तिमत्व खुलून येईल.

तुळ : खर्चावर नियंत्रण ठेवा

आज विशेषत्वाने पैशावर नियंत्रण ठेवा. पैसे खर्च करण्यासाठीच आजचा दिवस आहे असा पण म्हणूया. अर्थात गरजा आणि उधळणे यातला फरक ओळखा. त्या पद्धतीने खर्च करा. आपल्या बाबत इतर लोकं अफवाही उठवतील त्यामुळे मनस्ताप वाढेल.

वृश्चिक : लाभ मिळण्याचा दिवस

"केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे" असा आजचा दिवस आहे. स्वतः गोष्टी कराल आणि त्यामधून लाभ मिळण्याचा दिवस आहे. नातेवाईक आणि शेजारी यांच्यापासून सहकार्याची अपेक्षा आहे.

धनु : शाब्बासकी मिळेल

कार्यक्षेत्र रूंदावणार आहे. आपण केलेल्या गोष्टींसाठी वेगळी शाब्बासकी मिळेल. कामासाठी विशेष प्रवास होण्याचा आजचा दिवस आहे. यश, कीर्ती आपल्यासाठीच आहेत असे जाणवेल.

मकर : चांगल्या गोष्टी घडतील

स्वभावाविरुद्ध काही वर्तन करावे लागेल. खूप विश्वास नसला तरी देव-धर्मामुळे चांगल्या गोष्टी मार्गी लागतात हे लक्षात येईल. म्हणून आज विशेष उपासना आणि धार्मिक क्षेत्र यात सहभाग घ्या.

कुंभ : आज सावध राहा

धनाचा लोभ चांगला नाही. त्यामुळे आज कोणतेही कर्म असे करू नका की ज्यामुळे आपण संकटात अडकाल. भ्रष्टाचार, लाचलुचपत, काळा पैसा यापासून आज सावध राहा.

मीन : दिवस चांगला जाईल

"ओ रे पिया" असाच आजचा दिवस आहे. जोडीदाराशिवाय काही गोष्टी सहज शक्य होणार नाहीत. एकमेकांच्या साथीने आयुष्याचे नवीन स्वप्न रंगवाल आणि नवीन पल्ले पादाक्रांत कराल. दिवस चांगला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

SCROLL FOR NEXT