Horoscope Today : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना सापडतील नवे मार्ग; मनासारख्या घडतील घटना

Rashi Bhavishya Today : आजचे राशी भविष्य, मंगळवार ११ जून २०२४, आज या राशीच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील, तुमची रास यात आहे का? जाणून घ्या
Horoscope
Horoscope Today 11 June 2024Saam TV

दैनिक पंचांग ११ जून २०२४

वार - मंगळवार. तिथी - ज्येष्ठ शुक्ल पंचमी. नक्षत्र - आश्लेषा. योग - व्याघात. करण - बालव. रास - कर्क. दिनविशेष - चांगला दिवस.

मेष : कामे मार्गी लागतील

शासकीय कामे मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रामध्ये सहभागी होण्याचा आज योग आहे. सातत्याने कार्यरत राहाल. दिवस संमिश्र राहील.

वृषभ : जवळचे प्रवास होतील

जिद्द, चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जवळचे प्रवास होतील. भावंडांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : नवीन घटना घडतील

आर्थिक क्षेत्रामध्ये नवीन काही घटना घडामोडी घडतील. त्याला होकार द्यायला हरकत नाही. अचानक धनलाभ सुद्धा होऊ शकतो. वडीलोपार्जित प्रॉपर्टीशी निगडित काही गोष्टी असतील तर त्याचे निकाल आज मनाप्रमाणे लागतील.

कर्क : इतरांवर प्रभाव राहील

भावनेनं ओथंबलेलं आज मन राहील .आशावाद आणि आनंद या गोष्टी विशेष जाणवतील. आपण जे कराल त्याचा प्रभाव इतरांवर राहील. राशी प्रमाणे ममता आणि कनवाळूपणा आज उदयास येईल.

सिंह : महत्वाची कामे रडखडणार

काही वेळेला कितीही ठरवलं तरी काम वेळेत होत नाहीत आज असेच काम रखडण्याची दाट शक्यता आहे. मनस्ताप, तब्येतीच्या तक्रारी असा घेराव घेऊन आलेला आजचा दिवस आहे.

कन्या : कर्माचे फळ मिळेल

कीर्ती, प्रतिष्ठा वाढेल. उत्साह ,उमेद वाढणाऱ्या घटना आज घडतील. जुन्या गोष्टींचे केलेले कर्म आज लाभार्थी परताव्याने मिळेल.

Horoscope
Kanya Rashi Personality : कन्या राशीच्या लोकांमध्ये असतात १० खास गोष्टी; इतरांना करतात प्रभावित, जाणून घ्या

तुळ : सुयश नक्की मिळणार

तुमचं कार्यक्षेत्र आज अबाधित राहणार आहे. जे काम घ्याल त्यामध्ये सुयश नक्की मिळणार आहे. इतरांचा आदरही संपादन करणार आहात.

वृश्चिक : दिवस आनंदाचा ठरेल

महत्त्वाच्या काही वार्ता कानी येतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभणार आहे. भाग्याची जोड चांगले लाभल्यामुळे आजचा दिवस आनंदाचा ठरेल.

धनु : शारीरिक त्रास वाढतील

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा न करता एकट्याने काम करा. वादविवाद टाळा. मनस्ताप करून घेऊ नका. शारीरिक त्रास वाढतील.

मकर : मनाप्रमाणे निकाल लागतील

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील .वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील. कोर्ट कचेरीचे निकाल मनाप्रमाणे लागतील.

कुंभ : विनाकारण चिंता वाढेल

हितशत्रूंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार आहे. जुने आजार डोके वर काढतील. विनाकारण चिंता वाढेल.

मीन : नवीन मार्ग सापडतील

नवीन दिशा, नवीन मार्ग सापडणार आहेत. शैक्षणिक क्षेत्रात सुसंधी मिळणार आहे. संततीसाठी विशेष आज परिश्रम घेऊन योग्य दिशेने वाटचाल करण्यासारखी मार्गदर्शन करा.

Horoscope
Horoscope Today : आज विनायक चतुर्थी, बाप्पाच्या आशीर्वादाने कसा जाईल तुमचा दिवस? वाचा आजचं राशी भविष्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com