Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : काहींना लक्ष्मी प्राप्तीसाठी सुसंधी मिळतील, तर कोणाला होईल आजाराचे निदान, तुमची रास काय?

Horoscope Today in Marathi : आज काही राशीच्या लोकांना लक्ष्मी प्राप्तीसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे. तर काही जणांना आजाराचे निदान होण्याची शक्यता आहे. वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

बुधवार,१३ नोव्हेंबर २०२४,कार्तिक शुक्लपक्ष,प्रदोष, तुलसी विवाहारंभ,चातुर्मास्य समाप्ति.

तिथी- द्वादशी ,१३|०२

रास- मीन २७|११ नं.मेष

नक्षत्र-रेवती

योग-वज्रयोग

करण- बालव

दिनविशेष-शुभ दिवस

मेष - धावपळीने, धडपडीने यश मिळवलेले आहे तेवढेच ते टिकवणे ही गरजेचे आहे. कदाचित आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले गेले तर कामांमध्ये बिब्बा पडल्यासारखे काम होईल. काळजी घ्या.

वृषभ - प्रेमामध्ये यश मिळेल जुन्या गुंतवलेल्या गोष्टीतून आज फायद्याचा दिवस आहे. संकल्प सिद्धीला जातील.

मिथुन - कामासाठी प्रवास घडतील. योग्य रीतीने ठरवलेल्या गोष्टी पार पडतील. समाजकारणामधून यश दिसते आहे.

कर्क- पाण्याच्या ठिकाणी भाग्योदय होईल. संततीकडून सुवार्ता येतील. देवाविषयी विशेष आस्था वाटेल. चातुर्मास समाप्तीमुळे आपण केलेल्या उपासनेची योग्य फलिते आज मिळतील.

सिंह -धाडसाने पुढे जावेच लागेल. भले वाटेत किती काटे - कुटे आणि अडचणी आल्या तरीही सर्व बाजूला साराव्या लागतील. खोट्या स्तुतीच्या मागे जाऊ नका. वाईट गोष्टींची भुरळ यापासूनच सावधगिरी बाळगा.

कन्या- कामाचे स्वरूप, व्यवसायाचा आवाका वाढता राहील. भागीदाराच्या गोष्टी समजून घेतल्याने व्यवसाय वृद्धी होईल. दिवस चांगला आहे.

तूळ - जुने रोग डोके वर काढतील. स्त्रियांना गर्भाशयाची निगडित आजार असतील तर आज त्याचे निदान होईल. बाहेरचे खाणे टाळा. वृश्चिक- कलासक्त आणि रसिक असा आजचा दिवस जाणार आहे. प्रेम वीरांसाठी दिवस शुभ फलदायी आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी सुसंधी येतील.

धनू - घरी पाहुण्यांची उठबस राहील. आईचे विषयी जबाबदारी घ्यावी लागेल. मनस्वास्थ्य संदिग्नध राहील. नकारात्मकतेचे मळभ सोडून द्या.

मकर - भावंडांच्या सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. आपल्या कार्याला विशेष सन्मान मिळेल. लोकांकडून वाहवा होईल.

कुंभ- घरी सुसंवाद साधावा लागेल. तर मनासारख्या गोष्टी होतील. उगाचच धुसपूस आणि अबोला यापासून आज सावध राहा.

मीन - आपले रूप आणि सौंदर्य आज खुलून येईल. व्यक्तिमत्व उजळून निघेल. सकारात्मकता आणि आकर्षकता दोन्ही वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT