Lucky Zodiac Signs saam tv
राशिभविष्य

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Lucky Zodiac: आषाढी एकादशीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. रविवारी एकदाशी असून हा दिवस काही राशींसाठी लाभकारी असणार आहे.

Bharat Jadhav

ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार प्रत्येक राशींचं भविष्य पाहिलं जातं. उद्या म्हणजेच 6 जुलैचा दिवस काही राशींसाठी फार शुभ असणार आहे. ज्योतिष्यशास्त्रात प्रत्येक राशीचा एक स्वामी असतो. त्या ग्रहाचा त्या राशीवर जास्त प्रभाव असतो. एकादशीच्या दिवशी बारा राशींपैकी ५ राशींना मोठा धनलाभ होणार आहे. त्यांच्या जीवनातील सर्व संकटं दूर होणार आहेत. कोणत्या राशींना फायदा होणार आहे, हे जाणून घेऊ.

मेष राशी

मेष राशीसाठी उद्याचा दिवस भारी असणार आहे. व्यापारी वर्गातील लोकांना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. विवाहितांसाठी उद्याचा दिवस फार शुभ असणार आहे. आषाढी एकादशी असल्या कारणाने तुमच्यावर विठोबाची कृपा असणार आहे .

मिथून

या राशीसाठी आषाढी एकादशीचा दिवस खूप खास असणार आहे. एकादशीच्या दिवशी काही जण नवीन कार्याची सुरुवात करतील. तसेच तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली दिसेल. काही खास लोकांशी गाठीभेटी होतील. या दिवशी तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी देखील करू शकता.

कर्क

कर्क राशीसाठी हा दिवस खूप चांगला असणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळण्याची शक्यता आहे. तसेच ज्या लोकांचे पैसे कोणाकडे अडकले असतील किंवा कोणत्या प्रकरणातील पैसा येणारा असेल तो पैसा परत मिळतील. बहुतेकांच्या घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग घडेल. या राशीचे काही जातक आपल्या जोडीदाराबरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकतील.

तूळ

तूळ राशीसाठी एकादशीचा दिवस भाग्यशाली ठरणार आहे. यादिवशी काहीजण मित्रांबरोबर चांगला वेळ घालवतील. तसेच ज्या लोकांच्या पैशांशी संबंधित समस्या असतील तर त्या दूर होतील. काहीजण नवीन वस्तूंची खरेदी करतील. विवाहितांसाठी हा काळ चांगला असेल.

धनू राशी

धनु राशीच्या लोकांसाठीही आषाढी एकादशीचा दिवस फार भारी असणार आहे. या दिवशी सकारात्मक दृष्टीकोन असेल. शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी एकादशीचा दिवस चांगला आहे. दिवस चांगला जावा असं वाटत असेल तर नकारात्मक लोकांपासून दूर राहा. तुमचा मानसिक तणाव कमी होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित आहे. या गोष्टींना साम टीव्ही दुजोरा देत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT