आजचे पंचांग
रविवार,१७ नोव्हेंबर २०२४,कार्तिक कृष्णपक्ष.
तिथी- द्वितीया २१|०७
रास-वृषभ २८|३१ नं मिथुन
नक्षत्र- रोहिणी
योग- शिवयोग
करण-तैतिल
दिनविशेष- उत्तम दिवस
मेष - मोठी गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला आहे. घरातील जेष्ठांचा सल्ला आणि आशीर्वाद घेऊन आज कामे केल्यास विशेष यश मिळेल.
वृषभ - आज तुमचा दिवस तुमच्यासाठी असणार आहे. इतरांवर तुमचा प्रभाव राहील मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.
मिथुन - काही ना काही आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. हितशत्रूपासून सावध रहा. आज खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. विनाकारण मनस्ताप टाळा.
कर्क - दैनंदिन कामे मार्गी लागतील. मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांचा यांच्या सहभागातून लाभ प्राप्त होतील.
सिंह - तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी सन्मान प्राप्त होतील. कनिष्ठ आदर करतील.
कन्या - गुरुकृपा लाभेल. मानसिक स्वास्थ आणि समाधान लाभण्याचा आजचा दिवस आहे. विष्णू उपासना फलदायी ठरेल. अचानक आनंददायी घटना घडतील.
तूळ - भागीदारी मधील, व्यवसायातील काही निर्णय रखडण्याची आज शक्यता आहे. रटाळ असा दिवस राहील. आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देण्यापासून दुसरे काही शिल्लक राहणार नाही.
वृश्चिक - आपल्या मताविषयी आग्रही राहाल. मन आनंदी आणि आशावादी राहणार आहे. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल.
धनु - वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. कोणाकडूनही सहकार्याची अपेक्षा नको. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कामे करा.
मकर - कला क्षेत्रामध्ये सुसंधी लाभेल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरणार आहे. अचानक धनलाभ होईल.
कुंभ - साहस आणि धाडसाने काम करावे लागेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडेल. प्रॉपर्टीच्या कामांमध्ये यश मिळेल .
मीन - तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सुसंधी लाभेल. नवीन नवीन आव्हाने आज स्वीकारावी लागतील. ठरवाल त्या गोष्टी आज होतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.