Sangamner News : युतीचा प्रचार करतो म्हणून मारहाण; बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांवर आरोप

Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. यामुळे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते प्रचार करत रात्री उशिरापर्यंत गाठी भेटी घेत आहेत.
Sangamner News
Sangamner NewsSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

संगमनेर (अहिल्यानगर) : संगमनेर विधानसभेत युतीचे उमेदवार अमोल खताळ यांचा प्रचार करतो, म्हणून एकाला बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. मारहाण झालेल्या पंढरीनाथ वलवे यांना रात्री उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election) प्रचार अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. यामुळे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते प्रचार करत रात्री उशिरापर्यंत गाठी भेटी घेत आहेत. या प्रचारादरम्यान काही ठिकाणी वाद उफाळून येत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. असाच प्रकार (Sangamner News) संगमनेर येथे समोर आला असून महायुतीचा प्रचार करणाऱ्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचे समोर आले आहे. बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. 

Sangamner News
Yavatmal Politics: संजय राठोडांना तगडी फाइट, २० वर्षांनंतर माणिकराव ठाकरे मैदानात; कोण मारणार बाजी?

अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल 

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात शिवसेना महायुतीने अमोल खताळ यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या गावोगावी प्रचार रॅली सुरू आहेत. काल रात्री संगमनेर तालुक्यातील मिर्झापूर येथे प्रचार रॅलीत सहभागी झालेल्या पंढरीनाथ वलवे यास चार ते पाच जणांनी बेदम मारहाण केल्याने ते अत्यवस्थ झाले असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Sangamner News
Pune News: पुण्यात सापडलं मोठं घबाड! निवडणूक रणधुमाळीत अंदाजे ५ कोटींची रोकड जप्त केल्यानं खळबळ

ही मारहाण बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला जात आहे. आमच्या मतदारसंघात दहशत नाही असं म्हणणाऱ्या नेत्यांची हिच संस्कृती आहे का? असा सवाल युतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com