Hans Mahapurush Rajyog saam tv
राशिभविष्य

Guru Gochar: 12 वर्षांनी तयार होणार हंस-केंद्र त्रिकोण राजयोग; 3 राशींचं नशीब बदलून मिळणार आनंदाची बातमी

Jupiter Transit In Cancer: ज्योतिषशास्त्रानुसार, १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा हंस राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होणार आहे. हा ग्रहयोग अत्यंत शुभ मानला जातो आणि तो जीवनात सकारात्मक बदल घडवतो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार वर्ष 2026 मध्ये अनेक ग्रह आपापल्या उच्च आणि नीच राशींमध्ये गोचर करणार आहे. यामध्ये गुरु बृहस्पती यांना विशेष महत्त्व देण्यात येतं. गुरु ग्रह 2026 मध्ये आपल्या उच्च राशी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे केंद्र त्रिकोण योग आणि हंस राजयोग तयार होणार आहे.

या राजयोगाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत ज्यांचं भविष्य या काळात अधिक उजळणार आहे. या राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळेल तसेच पद–प्रतिष्ठा वाढणार आहे. यामध्ये कोणत्या राशींच्या व्यक्तींचा समावेश आहे ते पाहूयात.

कन्या रास (Virgo Zodiac)

कन्या राशीच्या लोकांसाठी हंस आणि केंद्र त्रिकोण राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

कर्क रास (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण आणि हंस राजयोग लाभदायक ठरू शकणार आहे. कारण गुरु ग्रह तुमच्या गोचर कुंडलीतील लग्न भावात भ्रमण करणार आहे. या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात उजळून निघणार आहे. नोकरी करणाऱ्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होणार आहे.

तूळ रास (Libra Zodiac)

तूळ राशीच्या लोकांसाठी हंस आणि केंद्र त्रिकोण राजयोग करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकणार आहे. कारण हे दोन्ही राजयोग तुमच्या राशीच्या कर्म भावात तयार होणार आहेत. या काळात करिअरमध्ये नवा टप्पा येणार आहेत. व्यापारात मोठा करार पक्का होऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care : लांब आणि जाड केसांसाठी जादुई नुस्खा, फक्त वापरा या घरगुती गोष्टी

Jaipur Accident: हायवेवर रात्री भयानक अपघात! भरधाव कारने १६ जणांना उडवले, अन्...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधी? एरियर किती मिळणार? वाचा कॅल्क्युलेक्शन

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

पुण्यातील गुंडगिरीला कोण जबाबदार? अजित पवारांनी थेट नाव घेतलं, एका वाक्यात विषय संपवला, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT