Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

कष्टाचं फळ मिळणार, घरी पाहुण्यांचं आगमन होईल; ५ राशींच्या लोकांवर महालक्ष्मी प्रसन्न होणार

thursday Horoscope : काही राशींच्या लोकांना कष्टाचं फळ मिळण्याची शक्यता आहे. घरी पाहुण्यांचं आगमन होऊ शकते.

Saam Tv

मेष : आजचा दिवस सकारात्मक ठरेल. कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील.

वृषभ : व्यावसायिकांसाठी आव्हानात्मक दिवस ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या संसारात गोडवा निर्माण होईल.

मिथुन : आजचा दिवस लाभदायक ठरेल. पिवळ्या वस्तू दान करणे लाभदायक ठरेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.

कर्क : ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत फायदेशीर ठरेल. करिअरमध्ये वरिष्ठांचं मार्गदर्शन फायदेशीर ठरेल. भगवान विष्णू आणि महालक्ष्मींची पूजा फलदायी ठरेल.

सिंह : करिअर आणि व्यवसायात यश मिळेल. मनात देवाविषयी श्रद्धा वाढेल. कामानिमित्त दूरचा प्रवास होईल.

कन्या : तुम्हाला दिवसभरात आरोग्याविषयी काळजी घ्यावी लागेल. शासकीय नियमांचं पालन करणे लाभदायी ठरेल. कुटुंबातील लोकांचं सहकार्य फायदेशीर ठरेल.

तुला : टीमवर्कचा फायदा मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात नव्या व्यावसायिकांची भेट होईल. महालक्ष्मी प्रसन्न होईल.

वृश्चिक : मेहनतीचं फळ मिळेल. एखाद्या गोष्टीचा अहंकार बाळगल्यास नुकसानदायक ठरेल. बजेटचा विचार करून खर्च करावा लागेल.

धनु : मित्रांकडून आनंद वार्ता कानी पडेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. पैसे दान करणे लाभदायक ठरेल.

मकर : दिवसभरात विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. जबाददार लोकांचा सहकार्य लाभेल. भावनिक निर्णय विचारपूर्वक घ्याल.

कुंभ : व्यवसायात केलेले प्रयोग यश मिळेल. नवीन ध्येय पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल. २ हा क्रमांक शुभ ठरेल.

मीन : कुटुंबात आनंदी वातावरण असेल. तुमच्या घरी पाहुण्याचं आगमन होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर शहरातील काही भागांमध्ये पाऊस, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

Ratnagiri: नदीत पोहण्यासाठी उडी मारली, पण परत बाहेर आलेच नाहीत; तिघांचा बुडून मृत्यू

PM मोदींनी मोडला जवाहरलाल नेहरुंचा रेकॉर्ड; 4398 दिवस पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधानांनी काय सांगितलं?

Nashik News : सासरचा छळ असह्य झाला, २५ वर्षीय महिलेनं आयुष्य संपवलं; पती, सासू-सासऱ्यावर गुन्हा

Satara: उरी सेक्टरमध्ये साताऱ्याच्या सुपुत्राला वीरमरण, ग्रेनेडच्या स्फोटात २ जवान शहीद

SCROLL FOR NEXT