Guru Purnima 2026 lucky zodiac signs  
राशिभविष्य

Guru Purnima : यंदाची गुरुपौर्णिमा अत्यंत खास! ४ राशींवर होणार गुरूची कृपा, करिअरमध्ये मान सन्मान अन् पैशांचा पाऊस

Guru Purnima 2026 lucky zodiac signs : यंदाच्या गुरुपौर्णिमेला समसप्तक योगासह सूर्य, गुरु आणि चंद्राची विशेष ग्रहस्थिती तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मेष, मिथुन, तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगती, धनलाभ आणि मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

यंदाची आषाढ पूर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टीने अत्यंत विशेष ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे 'समसप्तक योग' तसेच सूर्य, गुरु आणि चंद्राची विशेष युती घडून येत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, असा दुर्मिळ योग अनेक वर्षांनंतर तयार झाला आहे. गुरुपौर्णिमेच्या या शुभ मुहूर्तावर ४ राशींच्या व्यक्तींवर गुरूची विशेष कृपा बरसणार आहे.

गुरू हा ज्ञान, समृद्धी आणि प्रगतीचा कारक मानला जातो. त्यामुळे या गुरुपौर्णिमेला जुळून येणाऱ्या शुभ योगामुळे मेष, मिथुन, तुळ आणि धनु या राशींच्या जातकांना गुरूचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील, धनलाभाचे योग येतील आणि करिअरला नवी दिशा मिळेल असे सांगण्यात येत आहे.

मेष :

गुरूच्या कृपेने आर्थिक स्थितीत मोठा सुधार होईल. प्रदीर्घ काळापासून अडकलेले पैसे परत मिळतील आणि नोकरी-व्यवसायात प्रगतीची नवी दारे उघडतील.

मिथुन:

करिअरमध्ये मोठे यश आणि मान-सन्मान मिळेल. नवीन कामाची किंवा व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी गुरुपौर्णिमेचा हा काळ अत्यंत शुभ आहे.

तुळ:

व्यापाऱ्यांसाठी हा योग अत्यंत फायदेशीर ठरेल. अचानक धनलाभाची शक्यता असून वैवाहिक आयुष्यातील जुने वाद मिटतील.

धनु :

गुरूच्या आशीर्वादाने नशिबाची पूर्ण साथ लाभेल. नवीन योजना आणि गुंतवणुकीसाठी काळ उत्तम आहे. आध्यात्मिक कामांमध्ये रस वाढेल.

गुरुपौर्णिमेला काय करावे?

  • या दिवशी आपल्या गुरूंचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.

  • पवित्र नदीत स्नान करून यथाशक्ती दानधर्म करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.

  • भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून सत्यनारायणाची कथा ऐकावी.

डिस्क्लेमर (टीप): वरील लेखातील माहिती ही केवळ सामान्य मान्यतेवर आधारित आहे. या माहितीशी आम्ही सहमत असलोच असे नाही. कोणत्याही दाव्याची पुष्टी आम्ही करत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT