Guru Surya Uday saam tv
राशिभविष्य

Guru Aditya Rajyog: गुरु पौर्णिमेच्या दिवशी बनला ‘गुरु आदित्य राजयोग’, 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार पैसाच पैसा

Zodiac signs business wealth: गुरु पौर्णिमेला ज्योतिषशास्त्रानुसार एक अत्यंत शुभ आणि धनदायक 'राजयोग' तयार होत आहे, ज्याला 'गुरु आदित्य राजयोग' असे म्हणतात. यावेळी काही विशिष्ट राशींना व्यवसायातून प्रचंड धनलाभ मिळवून देईल आणि त्यांच्या नशिबाचे दार उघडेल.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक वेळा व्रत, सण किंवा विशेष दिवसांच्या योगाने काही दुर्मिळ राजयोग तयार होतात. ग्रहांनी त्यांच्या राशीमध्ये बदल केला की हे योग घडून येतात. ज्याचा परिणाम केवळ वैयक्तिक आयुष्यावरच नाही तर देश आणि समाजावरही होताना दिसतो. आज गुरु पूर्णिमा आहे आणि या दिवशी एक अत्यंत महत्त्वाचा आणि शक्तिशाली राजयोग ‘गुरु आदित्य राजयोग’ तयार होणार आहे.

हा योग मिथुन राशीत गुरु आणि सूर्याची युती झाल्यामुळे तयार झाला आहे. या योगाचा सर्वात मोठा फायदा काही खास राशींना होणार आहे. या राशींना या काळात नशीबाची पुरेपुर साथ मिळणार आहे. तर काही राशींना पैशांची मदत होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

कन्या रास

गुरु आदित्य राजयोग कन्या राशीच्या जातकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. यावेळी तुम्हाला करिअर, व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रात उत्तम यश मिळू शकतं. ज्यांना नोकरी आहे त्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. मित्रमंडळी आणि सहकारी यांच्याकडून चांगला सपोर्ट मिळू शकणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या आर्थिक लाभाची शक्यता आहे.

सिंह रास

सिंह राशीसाठी हा राजयोग अत्यंत अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांना चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. ही वेळ दीर्घकालीन योजना सुरू करण्यासाठी आणि समाजात आपली छाप सोडण्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे. व्यापाऱ्यांना मोठी व्यवसायिक डील होऊ शकणार आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरु-आदित्य राजयोग धन भावात तयार होतो आहे. धनवृद्धी आणि अचानक मिळणाऱ्या पैशाच्या संधी वाढणार आहेत. तुमच्या कलागुणांना ओळख आणि प्रशंसा मिळू शकणार आहे. उधारीत अडकलेले पैसे मिळण्याची संधी मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tushar Apte : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपचा स्वीकृत नगरसेवक

Shocking : "तुला पाळी आली असेल तर पुरावा दाखव", शिक्षिकेची अपमानास्पद वागणूक, विद्यार्थिनीचा मृत्यू; सरकारी कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

Pooja Sawant Mangalsutra: मराठमोळा साज! हे आहेत लेटेस्ट ट्रेडिंग लांब मंगळसूत्राचे पॅटर्न

Yuzvendra And Dhanashree: डिव्होर्सनंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा येणार एकत्र; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव, बहीण-भाऊ अन् बापाचा होरपळून मृत्यू, गाढ झोपेत असतानाच....

SCROLL FOR NEXT