Mangal Gochar mangal
राशिभविष्य

Grah Gochar: मंगळाच्या राशी बदलामुळे 3 राशींचं भाग्य उजळणार, धनत्रयोदशीला लागेल धनाचा ढीग!

Grah Gochar: सोमवारी मंगळदेव पुनर्वसूतून निघून पुष्य नक्षत्रात प्रवेश केलाय. ग्रहांच्या सेनापतींच्या या नक्षत्र बदलाचा 3 राशींवर सर्वाधिक प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला खूप महत्त्व आहे. मंगळ हा एक अतिशय प्रतिष्ठित, शक्तिशाली आणि प्रभावशाली ग्रह आहे. मंगळ धैर्य, आत्मविश्वास, शारीरिक सामर्थ्य, ऊर्जा, नेतृत्व क्षमता, वाहन, जमीन, घर इत्यादी जंगम आणि अचल संपत्तीचा शासक ग्रह आहे. जीवन सुरळीतपणे जगण्यासाठी या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. मंगळाच्या नक्षत्रातील बदलाचा सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव पडतो. दरम्यान सोमवारी मंगळ ग्रहाने पुनर्वसु नक्षत्र सोडून पुष्य नक्षत्रात प्रवेश केला. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर मंगळाचा हा नक्षत्र बदल राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटले जाते, जे २७ नक्षत्रांमध्ये ८व्या स्थानावर येते. पुष्य नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते. या नक्षत्राचा स्वामी शनि आहे आणि त्याची देवता बृहस्पति आहे. हे दोन्ही ग्रह मंगळाचे अनुकूल ग्रह आहेत. यामुळेच जेव्हा मंगळ पुष्य नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा खूप शुभ फल देत असते.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या चांगला राहील. पुष्य नक्षत्रातील मंगळाचे संक्रमण उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करणारे आहे. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. तसेच कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. व्यवसायात वाढ होऊ शकते, नवीन संधी उपलब्ध होतील. उद्योगधंद्यात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. किरकोळ व्यवसायात ग्राहक वाढतील आणि नफा वाढेल. जीवनातील इतर आर्थिक बाबींवरही परिणाम होईल, कर्जापासून तुमची मुक्ती मिळू शकते.

सिंह

सिंह राशीच्या लोकांनापुष्य नक्षत्रातील मंगळाच्या संक्रमणामुळे मोठा फायदा होणार आहे. या जातकांच्या नेतृत्वगुणांचा वापर करून चांगले उत्पन्न मिळविण्याची संधी मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या नोकरीत चांगली वाढ मिळू शकते. तुम्हाला तुमच्या नोकरीत चांगली वाढ मिळू शकते. तुमचा मान-सन्मान वाढेल. नवीन भागीदार मिळाल्याने व्यवसायाचा विस्तार होईल. व्यवसायात नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ आहे.

धनु

पुष्य नक्षत्रात मंगळाच्या संक्रमणामुळे धनु राशीच्या लोकांनाही फायदा होणार आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा वापर करून ते चांगले उत्पन्न मिळवू शकतील. नवीन ग्राहक मिळाल्याने व्यवसायाचा विस्तार होईल. उद्योगधंद्यांतून संपत्तीत प्रचंड वाढ होईल आणि बचतीच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: कळमनुरीत रंगणार चौरंगी लढत? संतोष बांगरांना ठाकरेंच्या टारफेंचं आव्हान

Lawrence Bishnoi: खासदार पप्पू यादव यांना जीवे मारण्याची धमकी; कॉलसाठी लॉरेंसने बंद केला होता तुरुंगातील जॅमर

Amit Thackeray: 12.50 कोटींची जंगम मालमत्ता असलेल्या अमित ठाकरेंकडे एकही कार नाही; जाणून घ्या एकूण संपत्ती किती

Maharashtra News Live Updates : कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसने उमेदवार बदलला, 4 उमेदवारांची शेवटची यादी

Devendra Fadnavis: 'भाजपला स्वबळावर सत्ता अशक्य', देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने खळबळ; VIDEO

SCROLL FOR NEXT