Gajkesari Rajyog saam tv
राशिभविष्य

Gajkesri Rajyog: 12 वर्षांनंतर बनतोय गजकेसरी राजयोग; गुरु-चंद्राच्या कृपेने मिळणार

Gajkesri Rajyog 2025: हिंदू धर्मात पितृ पक्षाला (Pitru Paksha) विशेष महत्त्व आहे. हा काळ पूर्वजांचे स्मरण आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित असतो. पण ज्योतिषशास्त्रानुसार, यावर्षी पितृ पक्षाचा काळ काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

पंचांगानुसार या वर्षी पितृपक्षाची सुरुवात ७ सप्टेंबरपासून झाली आहे आणि तो २१ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. पंधरवडाभर चालणाऱ्या या कालावधीत पूर्वजांच्या स्मरणार्थ श्राद्ध आणि तर्पण करण्याची परंपरा आहे. पितृपक्षाच्या काळात एक महत्त्वाचा योग जुळून येतोय. १४ सप्टेंबर रोजी चंद्र मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

या दिवशी गुरु बृहस्पति आधीच त्याचठिकाणी विराजमान आहेत. त्यामुळे गुरु आणि चंद्राची युती होऊन गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. या योगामुळे काही राशींच्या आयुष्यात मोठा बदल होऊ शकतो. अचानक धनलाभ आणि भाग्योदयाचे योग तयार होणार आहेत. पाहूया कोणत्या राशींना या शुभयोगाचा सर्वाधिक लाभ होईल.

तूळ रास

तुला राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग अतिशय लाभदायी ठरणार आहे. हा योग तुमच्या भाग्यस्थानात तयार होत असल्याने भाग्योदयाची संधी मिळणार आहे. या काळात तुम्हाला परदेशभ्रमणाची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल आणि समाजात तुमची ओळख वाढणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा राजयोग अत्यंत सकारात्मक ठरणार आहे. हा योग तुमच्या लग्नभावात तयार होत असल्याने आत्मविश्वास वाढणार आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळून उत्तम निकाल मिळू शकतात. आरोग्य चांगलं राहणार आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग अनुकूल ठरणार आहे. हा योग तुमच्या कर्मस्थानात तयार होत असल्याने कामकाजात उत्तम यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती होऊ शकणार आहे. तर व्यापाऱ्यांना चांगला धनलाभ होईल. या काळात तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नळदुर्गमध्ये सकल हिंदू समाजाने काढला मुक मोर्चा

'माझ्यासोबत शरीर संबंध ठेव मगच तुला मूल...' निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून सुनेचा छळ, पुण्यात खळबळ

Sunita Ahuja: 'गोविंदा त्याच्या सर्व हिरोईनसोबत फ्लर्ट...'; सोनाली बेंद्रेच्या शोमध्ये पत्नी सुनीताने केला धक्कादायक खुलासा

Pune : पुण्यातील वारजे पुलाखाली मोठी वाहतूक कोंडी, प्रवासी हैराण | पाहा VIDEO

Accident: नागपुरमध्ये खासदाराच्या कारला भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरू; वाहनाचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT