Kendra Yog saam tv
राशिभविष्य

Kendra Yog 2025: 3 सप्टेंबरपासून 'या' राशींना मिळणार प्रत्येक कामात यश; बुध-युरेनस बनवणार पॉवरफुल योग, पैसाही येणार

Budh Arun Kendra Yog 2025: ३ सप्टेंबरपासून एक अत्यंत महत्त्वाचा आणि शक्तिशाली ज्योतिषीय योग तयार होत आहे. बुद्धी आणि वाणीचा कारक ग्रह बुध आणि क्रांतीचा कारक ग्रह अरुण यांच्यात विशेष संबंध प्रस्थापित होणार आहे, ज्यामुळे एक शुभ योग तयार होईल.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार मानलं जातं. साधारणपणे बुध महिन्यात दोन वेळा राशी बदलतो आणि या बदलाचा परिणाम सर्व १२ राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसतो. सप्टेंबरच्या सुरुवातीला बुध सिंह राशीत भ्रमण करतोय. या काळात तो इतर ग्रहांशी संयोग करून काही शुभ आणि काही अशुभ योग तयार करतो.

लवकरच बुध आणि युरेनस ग्रह एकत्र येऊन केंद्र योग तयार करणार आहेत. हा योग ३ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजून ८ मिनिटांनी होणार आहे. तेव्हा बुध आणि युरेनस हे एकमेकांपासून ९० अंशांवर असणार आहेत. या विशेष योगाला केंद्र योग किंवा केंद्र दृष्टि असे म्हटलं जातं. या योगामुळे काही राशींना विशेष लाभ होणार आहे.

वृषभ रास (Taurus)

या राशीत बुध चौथ्या भावात स्थित आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना या योगाचा चांगला फायदा होऊ शकणार आहे. खूप काळापासून अडकलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. जमीन-जुमल्यासंबंधी प्रकरणात यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.

कर्क राशी (Cancer)

कर्क राशीसाठी हा केंद्र योग अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. अचानक धनलाभ होऊ शकतो. बऱ्याच काळापासून अडकलेली कामे पूर्ण होतील आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायी आहे. स्पर्धा परीक्षेत प्रयत्न करणाऱ्यांना चांगले फळ मिळू शकतं.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांना या काळात नशिबाचा पूर्ण साथ मिळू शकतो. गेल्या काही दिवसांपासून चालणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. नोकरी किंवा व्यवसायातून चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे. विद्यार्थ्यांनाही या काळाचा फायदा होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : वर्ल्डकपमधून विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ आऊट, श्रीलंका बाहेर; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

MSRTC: शिवशाही बस आता नव्या अवतारात येणार; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूदरात लक्षणीय घट; सरकारचे कोणते उपाय ठरताहेत गेम चेंजर?

खाण उपसंचालकावर व्हिजिलन्सची धाड, अधिकाऱ्याच्या घरात नोटांच्या थप्या

कर्जफेडीसाठी 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या, विरोधक आक्रमक, अधिवेशनात पडसाद

SCROLL FOR NEXT