budhaditya yoga saam tv
राशिभविष्य

Budhaditya Rajyog: 17 ऑक्टोबरपासून 'या' राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ; बुधादित्य राजयोग करणार श्रीमंत

Surabhi Jagdish

प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. या राजयोगांचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. येत्या काळात असाच एक राजयोग तयार होणार आहे. सूर्य आणि बुध ग्रहाच्या गोचरमुळे हा राजयोग तयार होणार आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, दसऱ्यानंतर ग्रहांचा राजकुमार बुध आणि ग्रहांचा राजा सूर्याचा तूळ राशीत संयोग होणार आहे. या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. सूर्यदेव 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.52 वाजता तूळ राशीत प्रवेश करेल. तर बुध ग्रहाने 10 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11:25 वाजता तूळ राशीत प्रवेश केला आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत हे ग्रह या राशीत राहणार आहेत. हा राजयोग कोणत्या व्यक्तींच्या राशींना लाभ देणार आहे, ते पाहूयात.

कर्क रास

बुधादित्य राजयोगाची निर्मिती या राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. व्यवसायात नवे प्रकल्प हाती येणार आहे. तुम्ही स्वप्नातील मालमत्ता खरेदी करू शकता. परदेशात नोकरीच्या शोधात असलेल्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लोकांकडून आनंदाची बातमी मिळू शकणार आहे.

तूळ रास

याच राशीमध्ये बुधादित्य योग तयार होणार आहे. यामुळे समाजात मान-सन्मान वाढू शकणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळणार आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. कार्यक्षेत्रात शुभ वार्ता तुम्हाला मिळणार आहे.

मकर रास

सूर्य-बुध संयोग आणि राजयोगाची निर्मिती स्थानिकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. अचानक थांबलेले पैसे मिळू शकतील. या काळात करिअरमध्ये प्रगती होईल. व्यावसायिकांसाठी काळ अतिशय अनुकूल राहील. आर्थिक लाभ यामुळे या लोकांच्या घरात आनंदच आनंद असणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : राज्यात दोन ते तीन दिवसांत आचारसंहिता लागेल - शरद पवार

Suryakumar Yadav: सूर्याने इतिहास रचला! T20I क्रिकेटमध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला दुसराच भारतीय फलंदाज

Gajkesari Rajyog 2024: 19 ऑक्टोबरपासून 'या' राशींचं नशीब फळफळणार; मिळणार भरपूर पैसा अन् समृद्धी!

Sanjay Gandhi National Park: संजय गांधी उद्यानातील ही प्रमुख आकर्षणे तुम्हाला माहिती आहेत का ?

Ulhasnagar News : चोरीला गेलेले ४ लाख २५ हजार रुपयांचे मोबाईल सापडले; सीईआयआर पोर्टलवरून शोध

SCROLL FOR NEXT