pratiyuti drishti yoga saam tv
राशिभविष्य

Pratiyuti Yog 2026: 9 जानेवारीपासून घरात येणार फक्त पैसा; शुक्र आणि गुरूच्या खास योगाने तयार होणार प्रतियुति दृष्टि योग

pratiyuti drishti yoga astrology: ज्योतिषांच्या मते, ९ जानेवारीपासून ग्रहस्थितीत मोठा बदल होणार आहे. शुक्र आणि गुरु यांच्या विशेष संयोगामुळे प्रतियुति दृष्टि योग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो. याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. नवीन वर्ष 2026 मध्ये अनेक ग्रहस्थिती बदलणार असून शुभ राजयोगांची निर्मिती होणार आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला गुरु आणि शुक्र यांच्या संयोगाने प्रतियुति दृष्टि योग तयार होणार आहे.

गुरु मिथुन राशीत वक्री अवस्थेत असतील, तर शुक्र धनु राशीत विराजमान असतील. धनु राशीत शुक्र राहून आधीच बुधासोबत लक्ष्मी नारायण योग आणि सूर्याबरोबर शुक्रादित्य योग तयार करणार आहे. वैदिक ज्योतिषानुसार 9 जानेवारी 2026 रोजी रात्री 11:02 वाजता हे दोन्ही ग्रह 180 अंशांवर असतील आणि प्रतियुति दृष्टि योगाची निर्मिती होणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळेल ते पाहूयात.

धनु राशी

धनु राशीच्या जातकांसाठी हा योग अत्यंत लाभदायी ठरू शकतो. सप्तम भावात गुरु आणि प्रथम भावात शुक्र विराजमान असतील. नशिबाची पूर्ण साथ मिळणार असून तुम्हाला कायदेशीर अडचणी दूर होणार आहे. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. अनावश्यक खर्च कमी होऊ शकतात.

कर्क रास

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा योग शुभ असणार आहे. या काळात घर-परिवारासोबत आनंदी वेळ घालवणार आहात. कामावर लक्ष केंद्रित राहणार असून आणि मेहनतीचे फळ मिळणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

मकर रास

मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र बाराव्या भावात आणि गुरु सहाव्या भावात विराजमान असणार आहे. दीर्घकाळापासून अडकलेली कामं पूर्ण होऊ शकणार आहेत. यावेळी करिअरमध्ये लाभ मिळू शकणार आहे.व्यापारात नफा होईल आणि जीवनसाथीसोबतचे संबंध सुधारतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप उमेदवाराच्या रॅलीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या घोषणा|VIDEO

भाजप कार्यालयाबाहेर तगडा बंदोबस्त; उमेदवारी न मिळाल्याने निष्ठावंत नाराज, RPI कार्यकर्तेही भडकले

लय भारी! आता Whatsapp स्टेटस ठेवताना नाही होणार चूक; मेटानं आणलं नवं फिचर

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात मोठा दणका, शिलेदार तुतारी फुंकणार|VIDEO

SCROLL FOR NEXT