Viprit Rajyog: 2026 मध्ये शुक्र बनवणार शक्तीशाली योग; या ३ राशींना मिळणार भरभरून यश

Venus powerful yoga 2026: ज्योतिषशास्त्रानुसार २०२६ मध्ये शुक्र ग्रह एक शक्तिशाली योग निर्माण करणार आहे. या दुर्मिळ ग्रहयोगामुळे काही राशींना मोठे यश, पैसा आणि कीर्ती मिळणार आहे.
Viprit Rajyog
Viprit Rajyogsaam tv
Published On

नव्या वर्ष 2026 मध्ये शनी सोडून इतर सर्व ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करणार आहेत. ग्रहांच्या या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. दैत्यांचा गुरु शुक्र साधारण 26 दिवसांनी राशी बदलतो आणि त्यामुळे एका वर्षात तो 12 राशींमध्ये गोचर करतो. शुक्राला प्रेम, आकर्षण, धन, वैभव आणि भोग-विलासाचा कारक मानण्यात येतं.

19 एप्रिल 2026 रोजी शुक्र स्वतःच्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. स्वतःच्या राशीत प्रवेश केल्याने मालव्य राजयोग तयार होणार आहे. तूळ राशीत शुक्र विपरीत राजयोग निर्माण करणार आहे. या योगामुळे काही राशींच्या व्यक्तींना भाग्याचा पूर्ण साथ मिळणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

Viprit Rajyog
Lucky zodiac signs: गुरुवारी शुभ मुहूर्ताची साथ; कोणत्या राशींना मिळणार आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांतता?

कर्क रास (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या लोकांसाठी विपरीत राजयोग अत्यंत लाभदायी ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रात चौथा भाव सुख-सुविधांचा कारक तर एकादश भाव आय, इच्छा आणि लाभाचा कारक मानला जातो. यावेळी तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. घरगुती सुख-सुविधा वाढणार आहेत. विवाहाचे योग तयार होतील.

तूळ रास (Tula Zodiac)

तूळ राशीच्या जातकांसाठी विपरीत राजयोग खास ठरणार आहे. विपरीत राजयोग अनेक क्षेत्रांत लाभदायी ठरेल. शुक्राची दृष्टि धन भावावर पडत असल्याने आर्थिक लाभ होणार आहे. या काळात तूळ राशीच्या जातकांना अप्रत्याशित धनलाभ होऊ शकणार आहे. घरगुती वाद मिटतील आणि घरात सुख-शांती राहील.

Viprit Rajyog
Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

कुंभ रास (Aquarius Zodiac)

कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचा विपरीत राजयोग लाभदायी ठरणार आहे. दीर्घकाळापासून असलेला मानसिक ताण कमी होईल. यावेळी तुमची जुनी मनोकामना पूर्ण होणार आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना जनतेचा पाठिंबा मिळणार आहे. घरात धार्मिक किंवा मंगलकार्य होण्याचे योग आहेत.

Viprit Rajyog
Zodiac signs: आजचा दिवस ठरणार ‘सुपर लकी’! जाणून घ्या कोणत्या ४ राशींना मिळणार जबरदस्त साथ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com