Mangal Vakri saam tv
राशिभविष्य

Mangal Vakri: २१ जानेवारीपासून मंगळाच्या वक्री चालीने 'या' राशींच्या आयुष्यात येणार भूकंप, बिझनेसमध्ये तोटा होण्याची शक्यता

Mangal Vakri 2025: ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो आणि त्याला पृथ्वीचा पुत्र देखील म्हटलंय. मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरचा काही ना काही परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. काही ग्रह वक्री आणि मार्गी चाल चालत असून त्याचा परिणाम देखील व्यक्तींवर होतो. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो आणि त्याला पृथ्वीचा पुत्र देखील म्हटलंय. मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मानला जातो.

ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा मंगळाच्या स्थितीत बदल होतो तेव्हा त्याचा सर्व 12 राशींच्या लोकांवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. वैदिक शास्त्रानुसार, 21 जानेवारी 2025 रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ कर्क राशीपासून वक्री चाल फिरून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाची वक्री चाल काही राशींसाठी अशुभ सिद्ध होऊ शकते. या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलाय ते पाहूयात.

वृषभ रास

ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी मंगळाची वक्री चाल दुसऱ्या घरात होणार आहे. मंगळ तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी आणू शकतो. या काळात कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी लोकांशी वादही होऊ शकतात. मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी उपाय करावेत.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळाची वक्री गती पाचव्या घरात होणार आहे. यावेळी मुलांच्या आरोग्याची चिंता असू शकते. मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबातील काही लोकांशी विशेषतः आईच्या बाजूने मतभेद होऊ शकतात. नोकरदारांना काळजी घ्यावी लागणार आहे. वादापासून दूर राहाणं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी मंगळाची वक्री चाल चौथ्या घरात होणार आहे. अशा परिस्थितीत त्याचा वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. घर, जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्येही अडचणी येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे वाद होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

SCROLL FOR NEXT