Hans Mahapurush Rajyog saam tv
राशिभविष्य

Hans Rajyog Diwali 2025: दिवाळीपासून 'या' राशींची धनाने भरणार झोळी; सोन्या-चांदीच्या नाण्यांचा होणार पाऊस

Zodiac signs to get rich from Diwali: दिवाळी (Diwali) हा सण केवळ दिव्यांचा नाही, तर सुख, समृद्धी आणि धन-लाभाचा सण मानला जातो. धनत्रयोदशीच्या (Dhanteras) शुभ मुहूर्तापासून ते भाऊबीजपर्यंत देवी महालक्ष्मीची विशेष कृपा भक्तांवर होते.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीत बदल करतो. यावेळी ग्रह गोचर करून शुभ योग आणि राजयोग निर्माण करतात. आता दिवाळीमध्येही अनेक ग्रह त्यांच्या स्थितीत बदल करणार आहे. यंदाच्या वर्षी दिवाळीचा सण २० ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे.

दिवाळीच्या दिवशी गुरु ग्रह आपल्या उच्च राशी कर्कमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे केंद्र त्रिकोण आणि हंस राजयोग निर्माण होणार आहेत. या राजयोगांमुळे काही राशीच्या लोकांचं नशीब चमकण्याची शक्यता आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना चांगल्या संधी मिळणार आहेत.

कर्क रास (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या लोकांसाठी हंस आणि केंद्र त्रिकोण राजयोग लाभदायक ठरू शकणार आहे. हे राजयोग त्यांच्या गोचर कुंडलीत प्रथम भावावर बनणार आहे. या काळात आत्मविश्वास वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मान-सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. अविवाहितांना विवाहाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. तुम्हाला धर्मिक किंवा मांगलिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते.

तूळ रास (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हंस आणि केंद्र त्रिकोण राजयोग अनुकूल ठरू शकणार आहे. हे राजयोग कर्म भावावर बनत असल्यामुळे या काळात प्रमोशन मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्याचसोबत नवीन जबाबदाऱ्या किंवा सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. व्यापार करणाऱ्यांना नवीन ऑर्डर मिळू शकतात, ज्यामुळे दिवाळी आर्थिक दृष्ट्या चांगली जाणार आहे.

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हंस आणि केंद्र त्रिकोण राजयोगामुळे चांगले दिवस येऊ शकतात. या काळात तुम्हाला नशीबाची साथ मिळू शकणार आहे. देश-विदेश प्रवासाची शक्यता आहे. या काळात समाजात तुमची एक वेगळी आणि सकारात्मक छबी निर्माण होणार आहे. ज्ञानाच्या जोरावर लोकांवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: ताजमहलावरील सोन्याचा कळस अखेर कुठे गेला? इतिहासात दडलेलं रहस्य जाणून घ्या

NAM vs SA: OMG! इंटरनेशनॅल क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर; शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात नामिबियाने दक्षिण आफ्रिकेला हरवलं

Maharashtra Live News Update : अजित पवार यांच्याकडून PDDC बँकेची पाहणी

Dharashiv : शेती वाहुन गेली, पिक मातीमोल झाल; जिवापाड जपलेली जनावर विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

भाजपकडून शिंदे अन् अजित पवार गटाला धक्का, मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत बड्या नेत्यांची एन्ट्री

SCROLL FOR NEXT