Surabhi Jayashree Jagdish
रात्री झोपण्यापूर्वी आपण काही चुकीच्या सवयी असतील तर झोपेची क्वालिटी खूप कमी होते. या सवयींमुळे शरीराला पूर्ण आराम मिळत नाही आणि थकवा वाढतो. दीर्घकाळ अशा चुका झाल्यास आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो.
झोपण्यापूर्वी मोबाइलचा जास्त वापर केल्याने मेंदू सतत एक्टिव्ह राहतो आणि झोप येण्यास उशीर होतो.
मोबाइलच्या स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश झोपेच्या नैसर्गिक चक्रावर परिणाम करतो.
रात्री हेवी आणि तळलेलं अन्न खाल्ल्यास पचनक्रिया मंदावते आणि पोटात जडपणा जाणवतो. अशा अन्नामुळे अॅसिडिटी आणि अपचनाची समस्या वाढू शकते. त्यामुळे शरीर आरामात न जाता झोपेची गुणवत्ता खराब होते.
चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते जे मेंदूला जागृत ठेवतं आणि झोप येण्यास अडथळा निर्माण करते.
झोपण्याच्या अगदी आधी हे पेय घेतल्यास झोप उशिरा येते. यामुळे सकाळी थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
रात्री झोपण्यापूर्वी सतत तणावपूर्ण विचार केल्यास मन शांत राहत नाही. अशा विचारांमुळे मेंदू ओव्हरथिंकिंगमध्ये जातो आणि झोप लागत नाही. याचा थेट परिणाम झोपेच्या गुणवत्तेवर होतो आणि मानसिक थकवा वाढतो.
झोपण्यापूर्वी प्रखर प्रकाशात जास्त वेळ बसल्यास शरीराला झोपेचा संकेत मिळत नाही. टीव्ही पाहण्यामुळे स्क्रीनचा प्रकाश आणि आवाज मेंदूला एक्टिव्ह ठेवतो. यामुळे शरीराचं नैसर्गिक स्लीप सायकल बिघडतं.
झोपण्यापूर्वी जास्त पाणी प्यायल्यास रात्री वारंवार लघवीसाठी उठावे लागते. यामुळे झोप वारंवार तुटते आणि शरीराला पूर्ण विश्रांती मिळत नाही. दीर्घकाळ ही सवय राहिल्यास झोपेची गुणवत्ता कमी होते.