Manasvi Choudhary
मुबंईसह संपूर्ण राज्यात धो-धो पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाळ्यात आरोग्यासह आपल्याजवळील वस्तूंची काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात फोनची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण पावसाचे पाणी फोनमध्ये गेल्यानंतर फोन कायमचा बंद पडू शकतो.
पावसात प्रवास करताना चुकून एखाद्याचा फोन पावसात फोन भिजला तर लगेच काय करावे? कोणत्या चुका टाळाव्यात? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
फोन पाण्यातून बाहेर काढताच सर्वात आधी स्विच ऑफ करा. फोन चालू ठेवल्यामुळे इतर भागांमध्ये पाणी जाऊन स्पार्किंग किंवा शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो.
फोनवरील पाणी पुसण्यासाठी सुती कापडाचा किंवा टिश्यू पेपरचा वापर करा, जेणेकरून पाणी फोनमध्ये जाणार नाही.
फोन भिजल्यानंतर फोनचे कव्हर, सिम कार्ड , मेमरी कार्ड आणि फोनची बॅटरी काढा आणि काहीवेळासाठी फोन स्विच ऑफ करा.
फोनमधून पाणी काढण्यासाठी जास्त हलवू नका. फोन हलवल्याने बाहेरील पाणी फोनच्या आत पसरू शकते.
फोनवरचे पाणी पुसल्यानंतर तो तांदळाच्या डब्यात पूर्णपणे बुडवून ठेवा.
ओला फोन लगेचच चार्जिंगला लावू नका. फोन पूर्णपणे सुकल्याशिवाय चार्जिंगला लावणे चुकीचे आहे.