Surya Gochar 2025: 17 ऑक्टोबरपासून चमकणार 'या' राशींचं भाग्य; 12 महिन्यांनी सूर्य करणार शुक्राच्या राशीत प्रवेश

Sun transit in Venus: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य लवकरच आपली रास बदलणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी सूर्य कन्या राशीतून बाहेर पडून शुक्र ग्रहाच्या तूळ राशीत (Libra) प्रवेश करणार आहे. तूळ रास ही सूर्याची नीच रास मानली जाते.
Surya Gochar
Surya Gocharsaam tv
Published On

वैदिक ज्योतिषानुसार, यंदाच्या दिवाळीला अनेक मोठे ग्रह त्यांच्या स्थितीत बदल करू शकणार आहेत. यावर्षी धनत्रयोदशीचा सण 18 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. त्यापूर्वी म्हणजेच 17 ऑक्टोबर रोजी ग्रहांच्या राजा म्हणजेच सूर्यदेव गोचर करणार आहे.

ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे, सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. सूर्याच्या या गोचरमुळे काही राशींसाठी हा काळ खूप लकी ठरू शकणार आहे. यामुळे त्यांचं नशीब चमकणार आहे. त्याचसोबत पद आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. यावेळी तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळणार आहे. यामुळे कोणत्या राशींना लाभ मिळू शकणार आहे ते पाहूयात.

Surya Gochar
Shukra Surya Yuti: शुक्राच्या राशीत बनणार पॉवरफुल शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या प्रत्येक इच्छा होणार पूर्ण

धनु रास (Dhanu Zodiac)

धनु राशीच्या लोकांसाठी सूर्याचं हे राशिपरिवर्तन अत्यंत सकारात्मक ठरू शकणार आहे. सूर्यदेव तुमच्या राशीपासून 11व्या भावात राहणार आहेत. या काळात तुमच्या कमाईत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन स्रोतांमधून आर्थिक लाभ मिळण्याची संधी वाढणार आहे. पैशांशी संबंधित जुन्या समस्या दूर होऊ शकतात. व्यापाऱ्यांसाठीही हा काळ फायदेशीर असेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल.

Surya Gochar
Mahabhagya Rajyog: 48 तासांनंतर बनणार आहे महाभाग्य योग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

कर्क रास (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्यदेवांचे राशिपरिवर्तन अनुकूल परिणाम देणारं ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. जुनं अडकलेलं काम पुन्हा एकदा सुरु होणार आहे. कौटुंबिक वातावरण सुधारणार आहे.

Surya Gochar
Lakshmi Narayan Yog: 12 वर्षांनंतर शुक्र बनवणार लक्ष्मी नारायण राजयोग; 'या' राशींना होणार धनलाभ

तूळ रास (Libra Zodiac)

तुला राशीच्या व्यक्तींसाठी सूर्यदेवांचं गोचर अत्यंत शुभ आणि फलदायी ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होणार आहे. मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकणार आहे. कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत असलेल्यांना नेतृत्वाची नवी संधी मिळू शकणार आहे.

Surya Gochar
Laxmi Narayan RajYog: दिवाळीनंतर बनणार पॉवरफुल लक्ष्मी नारायण राजयोग; 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com