Mangal vakri saam tv
राशिभविष्य

Mangal Vakri 2024: ७ डिसेंबरपासून या राशींच्या आयुष्यात होणार उलथापालथ; खर्च वाढल्याने आर्थिक संकट येणार

Mangal Vakri 2024: मंगळाच्या वक्री गतीचा काही राशीच्या लोकांवर अशुभ परिणाम होऊ शकतो. ७ डिसेंबरपासून कोणत्या राशींच्या व्यक्तींचा कठीण काळ सुरु होणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी मंगळ 7 डिसेंबर रोजी कर्क राशीत वक्री चाल चालणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ज्यावेळी वक्री चाल चालतो तेव्हा हा काळ अनेक समस्या घेऊन येतो.

मंगळाच्या उलट हालचालीचा सर्व 12 राशींवर काही प्रमाणात परिणाम होतो. मंगळाच्या वक्री गतीचा काही राशीच्या लोकांवर अशुभ परिणाम होऊ शकतो. ७ डिसेंबरपासून कोणत्या राशींच्या व्यक्तींचा कठीण काळ सुरु होणार आहे ते पाहूयात.

मेष रास

मंगळ तुमच्या चौथ्या घरात वक्री असणार आहे. या काळात घरामध्ये तणाव वाढू शकतो. तुम्हाला करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे.

वृषभ रास

मंगळ तुमच्या तिसऱ्या घरात वक्री होणार आहे. या काळात तुमच्या नात्यात गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत बदलीचे संकेत आहेत. व्यवसायात तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार नाही. प्रवासात काळजी घेणं गरजेचं आहे अन्यथा नुकसान होऊ शकतं. कुटुंबामध्ये कलह होण्याची दाट शक्यता आहे.

सिंह रास

मंगळ तुमच्या बाराव्या घरात वक्री असणार आहे. नशीब तुमच्या बाजूने कमी असल्याने व्यवसायातही नुकसान होण्याचा धोका आहे. मानसिक तणाव वाढू शकतो. प्रवास करताना काळजी घ्यावी लागणार आहे. व्यवसायातील भागीदारी तुटू शकते आणि खर्च वाढू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

SCROLL FOR NEXT