Shukra Rahu Yuti: नववर्षात होणार शुक्र-राहू युती; 'या' राशींना नव्या नोकरीसह होणार धनलाभ

Shukra Rahu Yuti 2025: 2025 च्या सुरुवातीला शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान राहू या ठिकाणी आधीच उपस्थित आहे.
Shukra Rahu Yuti
Shukra Rahu Yutisaam tv
Published On

ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक खास महत्त्व देण्यात आलेलं आहे. यामध्ये शुक्र-राहू यांनाही फार महत्त्व आहे. या दोन ग्रहांच्या स्थितीत थोडासा बदल झाल्यास प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. नववर्ष म्हणजेच 2025 च्या सुरुवातीला शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान राहू या ठिकाणी आधीच उपस्थित आहे. मीन राशीमध्ये राहू आणि शुक्राचा संयोग होणार असून या युतीने काही राशीच्या लोकांना बंपर लाभ मिळू शकतो.

पंचांगानुसार, शुक्र जानेवारीच्या शेवटी म्हणजेच 28 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7:12 वाजता मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्या ठिकाणी राहूशी संयोग होणार असून राहू आणि शुक्राची युती काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे.

Shukra Rahu Yuti
Ardhakedra Yog: ३ दिवसांनी शुक्र-शनी बनवणार अर्धकेंद्र योग; व्यवसायात होणार दुप्पट लाभ, प्रेमसंबंध सुधारणार

कर्क रास

राहू आणि शुक्राचा संयोग दशम भावात होणार असून या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळू शकणार आहे. नवीन वर्षात तुम्ही पडद्याआड न राहता समोर काम करण्यास प्राधान्य देऊ शकणार आहात. अनेक दिवसांपासून असलेलं परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे. तुम्हाला त्यांचं पूर्ण सहकार्य मिळू शकणार आहे.

Shukra Rahu Yuti
December Horoscope 2024: डिसेंबर महिन्यात 'या' राशींना राहावं लागणार सावध, धनहानीसोबत कुटुंबात होऊ शकतात कलह

तूळ रास

कन्या राशीच्या लोकांसाठी देखील नवीन वर्ष खूप चांगलं असू शकणार आहे. या घरात शुक्राची उपस्थिती वैवाहिक जीवनात आनंदाची खात्री मिळणार आहे. लग्नासाठी अनेक स्थळं येऊ शकतात. प्रेमविवाहाच्याही शक्यता आहेत. पदोन्नतीसह पगार वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी लाभ मिळू शकतो.

Shukra Rahu Yuti
December Horoscope 2024: डिसेंबर महिन्यात 'या' राशींना राहावं लागणार सावध, धनहानीसोबत कुटुंबात होऊ शकतात कलह

वृश्चिक रास

या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष 2025 खूप चांगलं असणार आहे. अशा स्थितीत या राशीचे लोक शत्रूपासून मुक्ती मिळवू शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायातही तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना बरेच फायदे मिळू शकतात. लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे. कुटुंबातून चांगली बातमी समोर येणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com