Guru Vakri saam tv
राशिभविष्य

Guru Vakri: 5 डिसेंबरपासून या राशींच्या नशीबात येणार पैसाच पैसाच; गुरुची वक्री चाल करणार मालामाल

Jupiter Transit Horoscope 2025 : ५ डिसेंबरपासून गुरु ग्रह वक्री अवस्थेत प्रवेश करणार असून, ज्योतिषांच्या मते या बदलामुळे काही राशींच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहस्थितीमुळे धनप्राप्तीची संधी वाढणार असून, नशिबाची साथ मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह हे मार्गी आणि वक्री होत असतात. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होत असतो.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, 5 डिसेंबर 2025 पासून गुरु ग्रह वक्री अवस्थेत कर्क राशीतून मागे सरकत मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. या बदलामुळे काही राशींसाठी शुभ काळाची सुरुवात होणार आहे. यावेळी काही राशींच्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहेत तर काहींना चांगली संधी मिळणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

सिंह रास

गुरु ग्रहाचं वक्री होणं सिंह राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी ठरणार आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होणार आहेत. जुनी अपूर्ण इच्छाही पूर्ण होणार आहे. प्रवासाची संधी मिळेल ज्यामुळे नवीन ऊर्जा जाणवेल. गुंतवणुकीतून फायदा होईल.

तूळ रास

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी गुरु ग्रहाची उलटी चाल सकारात्मक ठरणार आहे. गुरु तुमच्या 9व्या भावात म्हणजेच भाग्य भावात असणार आहेत. वडील किंवा गुरूंचा आधार मिळणार आहे. धार्मिक किंवा मंगलकार्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकणार आहे. अधिकारांमध्ये वाढ होईल आणि जीवनात सुखद अनुभव मिळतील.

धनु रास

गुरु ग्रहाची वक्री चाल धनु राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक ठरणार आहे. गुरु तुमच्या राशीपासून 7व्या भावात वक्री होणार आहे. व्यापारिक भागीदारीत नफा मिळण्याची शक्यता आहे. बिझनेसच्या पार्टनरशिपमधील कामातून फायदा होणार आहे. या काळात तुमची प्रतिष्ठा वाढेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs: या राशींसाठी आजचा दिवस सोन्याची संधी; कामात गती आणि धनलाभ होण्याची शक्यता

Maharashtra Nagar Parishad Live : भाजपवर आरोप करणाऱ्या निलेश राणेंकडूनही पैशांचे वाटप, वैभव नाईक यांचा आरोप

Maharashtra Live News Update: कराडजवळ सहलीच्या बसला अपघात, ८ विद्यार्थी जखमी

Mega Block News : महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवेर ४ दिवस विशेष ट्रॅफिक ब्लॉक,लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यावरही होणार परिणाम, वाचा संपूर्ण वेळापत्रक

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणी लखपती होणार, देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT