Horoscope In Marathi Saam tv
राशिभविष्य

Friday Horoscope : गणरायांची कृपा होणार; अचानक धनलाभाचा योग; ५ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार

Friday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांवर गणरायांची कृपा होणार आहे. तर काहींना अचानक धनलाभाचा योग आहे.

Anjali Potdar

पंचांग

शुक्रवार,१० ऑक्टोबर २०२५,अश्विन कृष्णपक्ष,

संकष्ट चतुर्थी.

तिथी-चतुर्थी १९|३९

नक्षत्र-कृत्तिका

रास-वृषभ

योग-सिद्धियोग

करण-बवकरण

दिनविशेष-कृत्तिका वर्ज्य

मेष - आजच्या चतुर्थी आहे. गणेश उपासना आपल्या राशीला फलद्रुप होईल. धनयोग उत्तम आहेत. नियोजनबद्ध पद्धतीने दिवस जाईल.

वृषभ - कलाकारांना सुसंधी घेऊन आलेला दिवस आहे. नाट्यक्षेत्र, मनोरंजन क्षेत्र यात विशेष प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. नवीन संधी मिळतील.

मिथुन - बंधन योग आहेत विनाकारण कटकटींच्या गोष्टींचा ससेमीरा मागे लागेल. खर्च वाढतील.वाणी, लेखणीच्या मार्गातून पैसे उभे करण्याचे बेत आखाल.

कर्क - सगे सोयरे, नातेवाईक यांच्या भेटीगाठी होतील. दिवस आनंदात जाईल. जुन्या गुंतवणूक मधून योग्य तो फायदा मिळेल. तब्येत मात्र जपावी.

सिंह - यशासाठी झगडावे लागेल. पण यश नक्की मिळेल. सहकार्यांच्या योग्य साथीमुळे बढतीचे मार्ग खुले होतील. वरिष्ठांच्याकडून विशेष कौतुक होईल.

कन्या - विष्णू उपासनेचे उत्तम फल मिळेल. लांबचे प्रवास होतील. तीर्थक्षेत्रि भेटी होतील. अति चौकसपणाने काही आलेल्या संधी कमवाल. सुवार्ता कानी येतील.

तूळ - मोठ्या प्रमाणात धन मिळण्याचे योग आज आहेत. जोडीदाराच्या कुटुंबीयांच्या कडून पैसा मिळेल. अचानक धनलाभ जसे की गुप्तधन वाममार्गातून पैसा आज संभवतो आहे.

वृश्चिक - कोर्टाच्या कामात यश मिळेल .जोडीदाराबरोबर व्यवसायाची वृद्धी होईल. नवीन गोष्टी करण्यासाठी दिवस चांगला आहे.

धनु - तब्येतीच्या तक्रारी वाढतील. उष्णतेचे विकार, मांडीच्या हाडाचे विकार त्रस्त करून सोडतील. नोकर वर्गाला दिवस संमिश्र आहे. आजोळी प्रेम लाभेल.

मकर - प्रेमामध्ये अबोला संभवतो आहे. संततीकडून अपेक्षा असल्या तरीही शिक्षणाच्या संदर्भात अडचणी उद्भवतील. उपासनेला मात्र दिवस चांगला आहे. शेअर्समध्ये यश मिळेल.आज चतुर्थी गणेश उपासना करावी.

कुंभ - जमिनीचे व्यवहार होतील. जुन्या गोष्टींची देवाणघेवाण यामध्ये विक्री होईल. कौटुंबिक सौख्याला दिवस चांगला आहे. मातृसौख्य उत्तम.

मीन - कार्यक्षेत्रामध्ये अडथळे आल्या तरी नेटाने पुढे जाल. प्रवासाचे योग आहेत. मैत्री वृद्धिंगत होईल. लहान भावंडांपासून फायदा होईल. दिवस संमिश्र आहे चतुर्थी करणी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धुळे कारागृह अधीक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 3 महिन्यांनी होणार होते निवृत्त

कमी बोला, काम जास्त करा" नगराध्यक्षांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा सज्जड दम

Pune Rickshaw Strike: पुणेकरांनो, रिक्षा बंदचं टेन्शन संपलं! चालक संघटनांनी घेतला मोठा निर्णय

दाजी असावा तर असा! दोन मेहुण्यांना दिले प्रत्येकी 1 कोटींचे हार; लग्नात उडवला पैशांचा धुरळा

देशाचे पुन्हा एकदा विभाजन होणार! ४ प्रांत मोडणार, १५ नवे राज्य होणार? पाकिस्तानात नेमकं काय शिजतंय?

SCROLL FOR NEXT