Horoscope In Marathi Saam tv
राशिभविष्य

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Friday Horoscope in Marathi : आज मेष राशींच्या मुलींना प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्यावी लागेल. तर काहींना दुरावा सहन करावा लागणार आहे.

Anjali Potdar

पंचांग

शुक्रवार,१४ नोव्हेंबर २०२५,कार्तिक कृष्णपक्ष.

तिथी- दशमी २४|५०

रास- सिंह २७|५२ नं. कन्या

नक्षत्र-पूर्वा

योग-वैधृति

करण-वणिज

दिनविशेष-वैधृति वर्ज्य

मेष - प्रेमामध्ये आपला उतावळेपणा वाढेल. आपल्या प्रियकराबरोबर बोलताना आज काळजी घ्यावी. काही गोष्टी रागाच्या भरात बोलल्या जातील. नाते जपण्यासाठी प्रयत्न कराल. इतर धनयोगाला दिवस उत्तम.

वृषभ - जितके झेपेल तेवढीच कामे करा. आज कामाचा वाढता प्रभाव आपल्यावर राहील. इतरांसाठी नको इतकी धावपळ केली जाईल. मात्र घरातील लोकांमुळे निभावून न्याल. नव्याने काही वस्तूंची खरेदी होण्याचा आजचा दिवस आहे.

मिथुन - आपली वक्तृत्व कला बहरेल. एखाद्या ठिकाणी मानाचे चांगले आमंत्रण आपल्याला येईल. कार्यक्रमात चांगल्या पद्धतीने आपण आपले योगदान द्याल. सर्वांच्याकडून वाहवा होईल.दिवस सकारात्मक आहे.

कर्क - आयुष्यात काही येणे जाणे चालू असते. आज धनाशी निगडीत अशा गोष्टी घडतील. अर्थात लक्ष्मी खेळती असावी म्हणजे काय याचा अनुभव आज तुम्हाला येईल. घरातील व्यक्तींबरोबर सौहार्द्याची वागणूक आज तुमची असेल.

सिंह - जे काही ठरवाल ते करणारच अशी काहीशी प्रतिज्ञा घेऊन आजचा दिवस आलेला आहे. कोणत्याही कार्यामध्ये न डगमगता पाऊल टाकावे. एक वेगळा आत्मविश्वास आज तुमच्यात असेल.

कन्या - बौद्धिकतेची कसोटी घेणारा आजचा दिवस आहे. अचानक काही गोष्टींचा भार, कामाचा महापूर असा काहीसा दिवस आज आहे. अडचणीतून वाट काढत सगळ्या गोष्टी निस्तराव्या लागतील.

तूळ - सून आणि जावई यांच्यापासून चांगली वागणूक आज मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ दिसतो आहे. एकूणच दिवस चांगला आहे.

वृश्चिक - कर्मप्रधानता हेच जमेस धरून आज काम कराल. एक वेगळा उत्साह आज तुमच्यात असेल.चांगले वाईट खरे खोटे या पडताळणीच्या बाहेर जाऊन कामे कराल.

धनु - लांबच्या प्रवासाचे योग आहेत.मंदिरामध्ये भेटी, तीर्थक्षेत्रे जाणे, दान, दानत,अध्यात्मक गुरूंची भेट किंवा इतरही भाग्यकारक घटना आज घडतील.

मकर - "ठेविले अनंती तैसेचि राहावे" असाच मनोदय असेल. कितीही कष्ट केले तरी सुद्धा जसे घडणार आहे ते होईलच हे आज जाणवेल. कडी कपारीतून वाट काढत एखादे ध्येय गाठण्याचा इवलासा प्रयत्न असेल.

कुंभ - आपल्यातील सकारात्मक गोष्टी आज कामाच्या ठिकाणी फायद्याच्या ठरतील. जुने अनुभव गाठीशी असतील तर ते आज तुम्हाला काम करण्यास प्रेरित करतील आणि मार्ग दाखवतील. याचा फायदा व्यवसायासाठी नक्की होईल.

मीन - पायाचे दुखणे मानसिक ताण त्रास आज आपल्या वाटेला आहेत. विचार करून निर्णय घ्यावेत. अविचाराने कृती नको. सावध राहा. महत्त्वाचे ऐवज सांभाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Sambhajinagar Tourism : संभाजीनगरजवळील ऐतिहासिक अन् सांस्कृतिक खजिना, लहान मुलांसोबत पिकनिकला उत्तम ठिकाण

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT